Home चंद्रपूर बामर्डा आणि सोईट येथील रेती घाटांवर अवैध उत्खननावर कारवाई करा

बामर्डा आणि सोईट येथील रेती घाटांवर अवैध उत्खननावर कारवाई करा

0
170

बामर्डा आणि सोईट येथील रेती घाटांवर अवैध उत्खननावर कारवाई करा

महसूल विभागाची संशयास्पद भूमिका

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र

 

चंद्रपूर :  वरोरा तालुक्यातील बामर्डा आणि सोईट येथील रेती घाटांवर अवैध उत्खनन होत असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे. महसूल विभागाची संशयास्पद भूमिका असल्याच्या दावा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, सध्या पावसाळा सुरू असून शासनाच्या निर्देशानुसार १० जूनपासून रेती उत्खनन बंद करण्याचे आदेश आहेत. असे असतानाही, वरील रेती घाटांवर बोट आणि पोकलेनच्या साहाय्याने उत्खनन सुरू आहे. या अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे.

 

उत्खननानंतर रेतीची वाहतूक तालुक्यातील अनेक गावांतून होत असल्याने वडगाव ते माढेळी हा नव्याने तयार झालेल्या  रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच, दररोज सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे रेती घाटाच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ होत आहे. तरीदेखील अवैध रेती वाहतूक थांबत नसल्यामुळे या प्रकरणी स्थानिक महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचेही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.

 

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यावर तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!