गोंडपिपरी तालुक्यातील धाबा-भंगाराम तळोधीत मा. आ. सूधीरभाऊ मूनगंटीवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाने साजरा
गोंडपिपरी :- सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे महाराष्ट्र राज्याचे विकासपूरूष चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र मा आ सूधिरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवसाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात आहे सूधिरभाऊंच दूरदृष्टी व नियोजनबद्ध कार्यपद्धती ही तळागळातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचलेल आहे.म्हणूनच जिल्ह्यातील आदिवासी मूली यशस्वीरीत्या गिर्यारोहन करून विक्रम गाजवू शकले. शाळा, महाविद्यालय, गार्डन पासून ते रस्ते निर्माण करून सामान्य माणसाच जीवन सुखकर केले.
म्हणूनच असामान्य काम करणारे सूधिरभाऊंसाठी धाबा येथे श्री संत प.कों.म.संस्थानचे मा.अध्यक्ष तथा जि प सदस्य श्री अमर बोडलावार यांच्यासोबत सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी कोंडय्या महाराजांची अभिषेककरून सूधिरभाऊंचा आयू आरोग्यासाठी प्रार्थना केली.आणि जि प शाळा धाबा येथे पेन, नोटबूक व खाऊ विद्यार्थ्यांना वाटप केले.
तसेच भंगाराम तळोधी येथे जि प उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सूद्धा पंधराशे नोटबूक , पंधराशे पेन,व बिस्कीट खाऊ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मा अमर बोडलावार मा जि प सदस्य चंद्रपूर ,सौ वैष्णवी अमर बोडलावार,मा ईंद्रपालजी धूडसे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी,मा स्वप्निल अनमूलवार उपसभापती कृ उ बा स , मा सूहास माडूरवार अध्यक्ष कों म सं धाबा, नंदाताई घोगरे सरपंच धाबा,रोशनी अनमूलवार, लक्ष्मीकाई बालूगवार सरपंच भंगाराम तळोधी, मारोतीजी अम्मावार ,हिरा कंदिकूरवार, सूरेंद्र घाबर्डे,रांजेंद्र गोहणे, संजय येलमूले, अजय पेरकावार ,विजय पेरकावार, मारोती आदे, नितिन येलमूले अध्यक्ष शा व्य स.धाबा, साईनाथ मानपल्लीवार, हरीश घोगरे, आशिष मामीडपल्लीवार, कांचन गरपल्लीवार, निखिल चंदंरगिरवार, अखिल चंद्रगिरवार,विठ्ठल चनकापूरे, जि प प्राथमिक शाळा धाबा व भंगाराम तळोधी चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते








