Home चंद्रपूर पालक सभा उत्साहात संपन्न – विद्यार्थी सुरक्षेवर मार्गदर्शन

पालक सभा उत्साहात संपन्न – विद्यार्थी सुरक्षेवर मार्गदर्शन

0
442

पालक सभा उत्साहात संपन्न – विद्यार्थी सुरक्षेवर मार्गदर्शन

नकोडा –
सरस्वती विद्या मंदिर नकोडा, येथे पालक सभा दिनांक 18/07/2025 रोजी उत्साहात पार पडली. या सभेला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापिका सौ. पल्लवी वाढई, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

सभेची सुरुवात स्वागत गीताने झाली. यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लैंगिक अत्याचार व सायबर गुन्हे या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
*लैंगिक अत्याचार या विषयावर श्री.योगेश पाटील साहेब (ए.पी.आय. घुग्गुस पोलिस स्टेशन)* यांनी मार्गदर्शन करताना बालकांना “गुड टच – बॅड टच”, गोपनीयतेचे महत्त्व, संशयास्पद वर्तन ओळखणे, आणि पालकांनी आपल्या मुलांशी खुलेपणाने संवाद कसा साधावा यावर भर दिला. त्यांनी पोस्को कायद्याची माहिती देत सांगितले की 18 वर्षांखालील मुलांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे आणि त्वरित तक्रार करणे अत्यंत आवश्यक आहे.

*सायबर गुन्ह्यांवर मा. अनुघुले साहेब (पी. एस. आय. घुग्घुस),* यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल व इंटरनेट वापर, सोशल मीडियाचे धोके, फसवणूक, ओळखीशिवाय व्यक्तींशी संवाद यापासून होणारे संभाव्य धोके यावर उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. त्यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या डिजिटल वर्तनावर लक्ष ठेवावे व योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.

या सर्व विषयांवर उपस्थित पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काही पालकांनी स्वतःचे अनुभव व शंका मांडल्या, ज्यावर तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यानंतर आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वारंवार चर्चा करीत शाळेला निधी मिळुन दिल्याबद्दल सौ उषाताई आगदारी (समाजसेविका, घुग्घुस) यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार सन्मान करण्यात आला.
शेवटी मुख्याध्यापकांनी शालेय विविध समित्यांची स्थापना करून पालकांचे आभार मानले व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक-शाळा सुसंवाद गरजेचा असल्याचे सांगितले.
सभेच्या समारोपीय सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हाताने वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!