माझ्यावर खंडणीचा नाही, फक्त सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा
पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले ; तरीही माध्यमांत चुकीची व बदनामी करणारी बातमी
आज सकाळपासून विविध वृत्तपत्रे आणि न्यूज पोर्टल्सवर अशा प्रकारच्या हेडलाईन्स झळकत आहेत की – “मयूर राईकवार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल.”
चंद्रपूर, 17 जुलै :- मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन आणि हेतुपुरस्पर पसरवण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकारामागचा सत्य घटनाक्रम असा आहे.
घटनाक्रम – 16 जुलै 2025
मी मयूर राईकवार, आम आदमी पक्षाचा जिल्हाध्यक्ष (चंद्रपूर), माझ्या सहकाऱ्यांसह लक्कडकोट (महाराष्ट्र-तेलंगणा सीमा) येथे असलेल्या आरटीओ चेकपोस्टवर गेलो होतो. गेल्या काही महिन्यांपासून अनेक ट्रकचालक, लघु व्यावसायिक व सामान्य नागरिकांकडून तक्रारी येत होत्या की या चेकपोस्टवर आरटीओ विभागाकडून रोज लाखो रुपयांची रोख वसुली ट्रकचालकांकडून केली जाते.
या पार्श्वभूमीवर आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्हाला RTO अधिकारी योगिता राणे व कांबळे यांनी अडवले. अडीच तास आमचं वाहन थांबवून ठेवलं. आम्हाला संशयाच्या दृष्टिकोनातून विचारणा करण्यात आली की, आमचं “मिशन” काय आहे, आम्ही पत्रकार आहोत का? त्यांच्याकडून स्पष्ट संकेत मिळाले की, त्यांना आम्ही स्टिंग ऑपरेशन करत असल्याची भीती वाटत होती.
या दरम्यान, त्यांचे वरिष्ठ अधिकारी व ७ इतर आरटीओ इन्स्पेक्टर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी देखील बोलताना “येथे रोज लाखोंची वसुली केली जाते आणि ही व्यवस्था वरपर्यंत माहिती आहे” असे कबूल केले.
त्यांनतर, माझ्यावर राजुरा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल
संध्याकाळपर्यंत आम्ही तेथून निघालो. पण लगेचच RTO अधिकारी योगिता राणे यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरुद्ध एक FIR दाखल केली.
या FIR मध्ये माझ्यावर आरोप करण्यात आला की :
* मी त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला.
* मी त्यांच्याशी हुज्जत घातली.
* मी योगिता राणे यांना “साले, मादरचोद” अशी अति अश्लील शिवी दिली.
या प्रकारचे शब्द मी कधीही वापरले नाहीत. मी सार्वजनिक जीवनात, लोकांसमोर जबाबदारीने बोलणारा कार्यकर्ता आहे. या आरोपांचा मी पूर्ण निषेध करतो.
पोलिस अधीक्षकांनी अधिकृतरित्या दिले स्पष्टीकरण
आज मी स्वतः मा. पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांची भेट घेतली. त्यांनी मला अधिकृतरित्या स्पष्ट केले की,
“मयूर राईकवार यांच्याविरोधात खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ महिला सरकारी कर्मचाऱ्याशी वाद व कामात अडथळा आणल्याबद्दल FIR दाखल आहे.”
त्यांनी याची स्पष्ट नोंद केली असून, कोणतीही आर्थिक वसुली अथवा खंडणीसदृश बाब झाली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
मात्र, काही माध्यमांनी खोटी व अतिरंजित बातमी पसरवली.
याशिवाय, काही माध्यमांनी – खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे असा खोटा ठपका माझ्यावर लावला. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम, बदनामी व अपकीर्ती झाली.
माझी भूमिका – सत्यासाठी लढा देत आहे.
* मी ट्रकचालकांकडून कुठलेही पैसे घेतलेले नाहीत.
* मी त्या ठिकाणी फक्त जनतेच्या तक्रारींवर आधारित माहिती संकलनासाठी गेलो होतो.
* माझ्याकडे व्हिडिओ व ऑडिओ स्वरूपात काही पुरावे आहेत, जे मी लवकरच अधिकृत यंत्रणांना देणार आहे.
* या घटनेच्या माध्यमातून मला गुंतवून, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
माध्यमांना विनंती
मी सर्व पत्रकार मित्रांना आणि जनतेला विनंती करतो की,
1. कृपया तथ्य तपासूनच बातमी प्रसिद्ध करा.
2. चुकीच्या माहितीमुळे कोणाच्याही प्रतिमेला हानी पोहोचू नये.
3. पोलिसांनी स्वतः कबूल केल्यानंतरही “खंडणी”च्या खोट्या बातम्या पुढे न पसरवाव्यात, असे त्यांनी आज घेतलेल्या पत्र परिषदेत सांगितले.









