Home गडचिरोली गडचिरोली-उमरखेड बसचा भीषण अपघात : महिला व चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू, 34...

गडचिरोली-उमरखेड बसचा भीषण अपघात : महिला व चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू, 34 प्रवासी गंभीर जखमी

0
70

गडचिरोली-उमरखेड बसचा भीषण अपघात : महिला व चिमुकल्यासह 3 जणांचा मृत्यू, 34 प्रवासी गंभीर जखमी

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :- गडचिरोली ते उमरखेड जाणाऱ्या प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन महिला व छोट्या मुलासह एकूण 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 34 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत जखमी प्रवाशांची विचारपूस केली. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून प्रशासनाने सर्व जखमींवर योग्य व तत्काळ उपचार करावेत अशी मागणी केली.
यावेळी प्रा. प्रशांत देव्हारे यांनी अपघातातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!