Home गडचिरोली शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जागा अधिग्रहण करू नका – शेतकरी बचाव जनआंदोलन...

शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जागा अधिग्रहण करू नका – शेतकरी बचाव जनआंदोलन समिती

0
147

शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जागा अधिग्रहण करू नका – शेतकरी बचाव जनआंदोलन समिती

शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शी चर्चा करीत दिलं निवेदन

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :- जिल्ह्यात उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचे षडयंत्र सुरू असून, या प्रक्रियेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावाच्या सुपीक जमिनीवर एम. आय. डी. सी. च्या माध्यमातून जे. एस. डब्लू.लिमिटेड कंपनी चा डोळा टपलेला आहे व प्रशासनाच्या वतीनी तशी जोरदार हालचाल ही सुरु झाली आहे.
या जमीन अधिग्रहण प्रक्रियेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विविध प्रकारची आंदोलने केली परंतु शासनानी कोणत्याच प्रकारची शेतकरी हिताची उचित ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे भेंडाळा परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंब उदरनिर्वाहची भाकर हिसकावल्यास कुटुंब उघड्यावर पडेल. जीवन उद्धवस्त होण्याची भीती शेतकरी वर्गाची झोप उडवीत आहे.
सुपीक असलेले भेडाला क्षेत्र सोडून गडचिरोली जिल्यात इतरत्र कुठें ही एम. आय. डी. सी. ची निर्मिती करा परंतु भेंडाळा परिसराचा विचार सोडा. भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन अधिग्रहित करू देणार नाही असे ठाम मत शिष्टमंडळानी व्यक्त केले.

गडचिरोली जिल्ह्याचा ७०% भाग जंगलाने व्यापलेला आहे. केवळ ३०% जमीन शेती आणि वस्तीसाठी उपलब्ध असताना, आता चामोर्शी तालुक्यातील १४ गावांमधील सुपीक जमीन अधिग्रहित केली जात आहे. आगामी काळात आणखी ३३ गावे या प्रक्रियेत येणार असून, यामुळे सुमारे ५० गावे ओसाड पडण्याची आणि हजारो शेतकरी भूमिहीन होऊ शकतात.

एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांना प्रति एकर केवळ ५ ते ८.५ लाख रुपये दिले जात आहेत, जो अत्यंत कमी मोबदला आहे. उद्योगांना आमचा विरोध नाही, उद्योग यावे,विकास व्हावा पण त्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमिन न घेता पडीक जमिनीवर उभारावेत.

लोहखनिज वाहतुकीमुळे जिल्ह्यात आजतागत २०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, तरीही मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत मिळालेली नाही.आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन त्यांच्या मूळ संस्कृतीला धक्का लावण्याचे काम सुरू आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतकरी जनहित समितीच्या शिष्टमंडळानी चर्चा करून निवेदन सादर केले. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या कल्याण्यासाठी सरकारने बळजबरीने जमिनी अधिग्रहण प्रक्रियेस पूर्णतः स्थगिती देऊन भेंडाळा परिसरातील सुपीक जमीनधारक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

यावेळी गडचिरोली जिल्हयाचे सहपालकमंत्री ऍड.आशिष जयस्वाल, गडचिरोली विधानसभा चे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाअध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, व इतर पदाधिकारी तसेच भेंडाळा परिसरातील शेतकरी वर्ग तथा शेतकरी बचाव जनआंदोलन समितीचे अध्यक्ष मनोज पोरटे सह शिष्टमंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!