ट्रॅक्टर अपघातातील जख्मी महिलेला कंकडालवार कडून आर्थिक मदतीचा हात
चिंतलपेठ येथे महिला मजुरांची ट्रॅक्टर पलटली…अनेक महिला गंभीर
अहेरी, सुखसागर झाडे :-कापूस तोडणीसाठी नवेगाव येथून जामगा येथे जात असलेल्या महिलांवर मोठे संकट कोसळले.चिंतलपेट परिसरात महिला मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने भीषण अपघात घडला.या अपघातात अनेक महिला जखमी झाल्या असून यात वंदना मनोहर गाऊत्रे (वय ५४,रा.नवेगाव) ही महिला गंभीर जखमी झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार,सकाळच्या सुमारास वंदना गाऊत्रे यांच्यासह अनेक महिला कापूस काढण्यासाठी ट्रॅक्टरने जामगा येथे जात होत्या.दरम्यान चिंतलपेट येथे ट्रॅक्टरचा तोल जाऊन तो पलटी झाला.या अपघातात महिलांना जबर दुखापत झाली.
जखमींना तात्काळ मदत करत वंदना गाऊत्रे यांना त्वरित चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान,वंदना गाऊत्रे यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.त्यांच्या पतींची प्रकृती आधीपासूनच खालावलेली असून ते खाटेवर आहेत.कुटुंबात एकच मुलगा श्रीकांत मनोहर गाऊत्रे आहे.या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले होते.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.यावेळी प्रवीण रेषे,बादल कोटरंगे,अतुल शेंडे,शरद कोटरंगे, पंकज शेंडे,पंकज कोटरंगे,सूरज शेंडे आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढाकार घेत जखमी वंदना गाऊत्रे यांना आर्थिक मदत दिली.त्यांच्या या मदतीमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून,गरजू कुटुंबाला अधिकाधिक मदत मिळावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.









