Home गडचिरोली अवैधरित्या सागवान व बिजा प्रजातीचे झाडे तोडल्या प्रकरणी आरोपीना 10 एप्रिल पर्यंत...

अवैधरित्या सागवान व बिजा प्रजातीचे झाडे तोडल्या प्रकरणी आरोपीना 10 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

0
81

अवैधरित्या सागवान व बिजा प्रजातीचे झाडे तोडल्या प्रकरणी आरोपीना 10 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

गडचिरोली, सुखसागर झाडे
धानोरा तालुक्यातील मेंढा(लेखा) गावालगतच्या जंगलातून अवैधरित्या सागवान व #बिजा_वृक्ष तोडून इमारती लाकूड बनविल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चिन्नू रैनू दुगा, कालिदास बिड्डू आतला आणि संतोष देव राव तोफा (सर्व रा.मेंढा) अशी आरोपींची नावे आहेत. २६ मार्च रोजी मेंढा येथील वनरक्षक एच.के.मडावी व क्षेत्र सहायक ए.के.गांगरेड्डीवार हे दुधमाळा परिसरात गस्तीवर असताना मेंढा गावालगत संतोष देवराव तोफा यांच्या शेतात सागवान व बिजा प्रजातीची इमारती लाकडे कापण्यात येत असल्याचे आढळून आले. ही लाकडे अवैधरित्या जंगलातून तोडून आणल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत वनाधिकाऱ्यांनी १९ सागवान व २ बिजा प्रजातीची लाकडे जप्त केली होती. भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये वनाधिकाऱ्यांनी चिन्नू रैनू दुगा, कालिदास बिड्डू आतला आणि संतोष देवराव तोफा यांना अटक केल्यानंतर त्यांना ३० मार्चपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. आज न्यायालयाने तिन्ही आरोपींना १० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!