Home चंद्रपूर १ मार्च २०२६ ला अंनिसची संघटन बांधणी बैठक

१ मार्च २०२६ ला अंनिसची संघटन बांधणी बैठक

0
148

१ मार्च २०२६ ला अंनिसची संघटन बांधणी बैठक

चंद्रपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-संघटक, बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंत प्रा.शा श्याम मानव यांच्या नेतृत्वात अंधश्रद्धा निर्मूलनाचे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्य महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये सातत्याने सुरू आहे. काळाची गरज असलेले हे कार्य अधिक व्यापक व प्रभावी व्हावे यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ दरम्यान विदर्भात संघटन बांधणी अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील संघटन बांधणी संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक दिनांक १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्राम गृह, क्लब ग्राउंड जवळ, चंद्रपूर येथे होणार आहे. या बैठकीला समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून बैठकीत जिल्ह्यातील संघटन बांधणी, भविष्यकालीन नियोजन व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. सदर विशेष बैठकीला जिल्हाभरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, अनिल लोणबले, प्रा.बालाजी दमकोंडवार, निलेश पाझारे, रजनी कार्लेकर, निखिलेश चामरे, अविनाश आंबेकर, यशवंत कायरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!