Home चंद्रपूर उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक – डॉ. वैशाली कतवारे

उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक – डॉ. वैशाली कतवारे

0
59

उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक – डॉ. वैशाली कतवारे

 

कोरपना प्रतिनिधी
गडचांदूर – उत्तम आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन व्यक्तिमत्व विकास शिबिरात बोलताना प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वैशाली कतवारे यांनी केले. त्या महिलांचे आरोग्य व समस्या या विषयावर बोलत होत्या, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, यांच्या समन्वयाने शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने तीन दिवसीय व्यक्तीमत्व विकास शिबिराचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह होते. अन्य विषयाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. अनिस खान, डॉ. स्नेहल ढोके यांनी वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेश गायधनी यांनी केले. प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी विकासाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!