आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) मानाचा मुजरा!
घुग्घुस येथील आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि.१९ फेब्रुवारी २०२६ गुरूवार रोजी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच मानाचा मुजरा!
शिवभक्त कार्यकर्त्यांनी,सामुहिक भाजप पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र आराध्य दैवत आणि ‘हिंदवी स्वराज्याचे’ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला आणि विचारांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.तसेच आपणास शिवजयंतीच्या हार्दिक भुभेच्छा एकामेकांना व जनतेला देण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी म्हणत नारे देण्यात आले.
याप्रसंगी भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष श्री. संजय तिवारी, महिला शहराध्यक्ष सुचिता लुटे ,गट नेता व नगर सेविका मिना मोरपका, नगर सेवक गणेश पिंपळकर, आशिष माशिरकर, इमरान खान, स्वप्नील वाढई, मुन्ना लोडे,विनोद चौधरी,मयूर कालवल, राजेश मोरपका,संतोष पाटील,राजेंद्र लुटे,रामन तांड्रा, रुपेश भटवलकर, रुपेश कोहळे, महादेव देशमाने, प्रेम गंगाधरे, राजकुमार गोडसेलवार,विकास निषाद,रोहित आसम,दयाराम सरोज,आतिश लोडे,संजय पखाले,मुलचंद सरोज,नीरज यादव, सुनीता पाटील,नीतू चौधरी, प्रेमा तग्रपवार,नितू जैस्वाल, संगीता बोबडे,रेखा रेगुंडवार,सविता आवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








