बाल आनंद मेळावा : खरी कमाई
जि.प.उच्च प्राथ. शाळा वेलतूर तुकूम चा स्तुत्य उपक्रम
चामोर्शी : सुखसागर झाडे
आज दिनांक 19 फेब्रूवारी 2026 ला शिवजयंतीच्या निमित्याने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेलतूर तू येथे बाल आनंद मेळावा अंतर्गत खरी कमाई उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
NEP 2020 नुसार अनुभवाधारित व आनंददायी शिक्षणाला चालना देण्यासाठी जि.प.उच्च प्राथ. शाळा वेलतूर तुकूम येथे “बाल आनंद मेळावा”* अंतर्गत खाद्यपदार्थ विक्री उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केलेले स्वच्छ, पौष्टिक व चविष्ट खाद्यपदार्थ शाळेत विक्रीसाठी मांडले. स्टॉल सजावट, पदार्थ मांडणी, ग्राहकांशी संवाद व पैशाचे व्यवहार हे सर्व विद्यार्थी स्वतः करत होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, संघभावना, स्वच्छतेचे महत्त्व, आर्थिक साक्षरता यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.पालक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
अनुभवातून आणि कृतीतून शिक्षण हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बचत, खर्चाचे भान, नफ्याचे महत्त्व व आर्थिक शिस्त समजली. लहान वयातच पैशाची किंमत कळल्यामुळे ते भविष्यात अधिक सजग व स्वावलंबी नागरिक बनण्याकडे वाटचाल करतील.









