Home चंद्रपूर घुग्घुस येथील गणराज्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

घुग्घुस येथील गणराज्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

0
104

घुग्घुस येथील गणराज्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये २६ जानेवारी गणराज्य दिनानिमित्त केंद्रामध्ये सकाळी ७:३० वाजता ड्रा.वैद्यकीय निलेश पडगीलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली.

तसेच ड्रा.निलेश पडगीलवार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आले.तसेच

भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ तसेच E-cigarette बंदीबाबतचा दि. १८/०९/२०१९ चा अध्यादेश यांची प्रभावी अंमलबजावणी होनेकारिता आज तंबाखू मुक्तीची शपथ घेत आहोत-

“शपथ”

तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परीणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर, या व्यसनांपासून. दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर, आणि माझा परिसर तंबाखूमुक्त रहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या, २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेटमुक्त करेन. मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि, माझा महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याचा प्रयत्न करेन

द्या तंबाखू व ई-सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार

यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.निलेश पडगीलवार,
बोरीकर, कुमारे, आरोग्य सहायक भोयर तसेच महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!