घुग्घुस शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पृर्णाकृती पुतळ्याचा चतुर्थ वर्धापन
भव्य धम्म सम्मेलनात नागरिकांची अलोट गर्दी
घुग्घुस येथे दि. २६ व २७ जानेवारी २०२६ या दोन दिवसीय भव्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर येथे बौद्ध सर्कल समिती घुग्घुस व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्यातर्फ आयोजन करण्यात आले. सर्वधर्म समभाव समाज बांधवाची शांतिपूर्वक नागरिकांची अलोट गर्दी झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर, घुग्घुस येथे संपन्न झाले. बौद्ध सर्कल समिती, घुग्घुस आणि नवबौद्ध स्मारक तथा बहउद्देशीय समिती, घुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची रूपरेषाः
दिवस पहिलाः सोमवार, २६ जानेवारी २०२६
सकाळी ११:३० वा. (प्रथम सत्र): धम्म संमेलनाचे उद्घाटन व धम्मदेशना पूज्य भंतेजी मेधंकर महाथेरो आणि पूज्य भंते रत्नमणी थेरो यांच्या हस्ते करण्यात आले.
द्वितीय सत्रः सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. रितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संविधानासमोरील आव्हाने आणि डॉ. बाबासाहेबांचे संघटन कार्यावर तज्ज्ञ वक्त्यांचे (अॅड. अभय लोखंडे व प्रा. डॉ. प्रमोद नारायणे) मार्गदर्शन केले.
सायंकाळी: केंद्रीय शिक्षिका गायत्रीताई रामटेके यांचा ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आले.
रात्री ६:०० वा.: इंजि. पवन महाराज दवंडे (अमरावती) यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम जोरदार,जंगी स्वागत करुन अलोट नागरिकांच्या गर्दीत शांतिपूर्ण समाधानीत पार पडला.
दिवस दुसराः मंगळवार, २७ जानेवारी २०२६
सकाळी ११:३० वा.: उद्घाटन मा. प्रविण खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यातआले.तसेच. मुख्य पाहुणे म्हणून मुख्याधिकारी निलेश रांजनकर, मा. सब्यासाची डे दे, मा. सत्यनारायण दिगांमर्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष दिप्ती सुजित सोनटक्के व नवनियुक्त नगरसेवकांचा सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आले.तसेच
दुपारी २:३० वा.: महिलांच्या हक्कांवर आधारित सत्रात मा. वैशालीताई डोळस (औरंगाबाद) आणि मा. जगदिश गवई मार्गदर्शन जोरदार भाषणात व्यक्त करण्यात आले.
सायंकाळी ४:०० वा.: ‘कल्याणकारी राज्याची संकल्पना’ या विषयावर मा. शेख सुभान अली साहेब आणि मा. डॉ. दिलीप कांबळे यांचे व्याख्यानात अलोट गर्दी जमली सर्वधर्म समभाव समाज बांधव एकत्रित त्यांच्या व्याख्यानात रंगतदार, रंग रूप असुन नागरिकांकडून बोलण्यात येत होते.धडक धडक व्याख्यान अती सुंदर असे बोलण्यात येत होते.
रात्री ६:०० वा.: सुप्रसिद्ध गायक निरज साबरी (नागपूर) यांचा भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहात जाणीवपूर्वक शांतिपूर्ण समाधान व्यक्त करत पार पडला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध सर्कल समितीचे सर्व पदाधिकारी तसेच नवबौद्ध स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी व दोन्ही समितीचे सदस्य गण या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले होते.
यावेळी व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, स्वागत समिती, भोजन व्यवस्था समीती,सजावट समिती, प्रसिद्धी प्रमुख,सदस्यगण तसेच आयोजक बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुसच्या वतीने दोन दिवसीय भव्य धम्म संमेलन शांतिपूर्वक पार पडले.







