Home चंद्रपूर ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त घुग्घुस येथे २६ व २७ जानेवारीला भव्य धम्म...

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त घुग्घुस येथे २६ व २७ जानेवारीला भव्य धम्म संमेलन’ आयोजित

0
97

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त घुग्घुस येथे २६ व २७ जानेवारीला भव्य धम्म संमेलन’ आयोजित

बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहउद्देशीय समितीने घेतली पत्रपरिषद

 

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकती पुतळ्याचा वर्धापन दिन आयोजन करण्यात आले आहे हे संमेलन सोमवार दि. २६ जानेवारी आणि मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ आणि भारतीय संविधानाच्या रौप्य महोत्सवी दिनाचे औचित्य साधून घुग्घुस येथे दोन दिवसीय ‘भव्य धम्म संमेलनाचे

रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर, घुग्घुस येथे संपन्न होणार आहे. बौद्ध सर्कल समिती, घुग्घुस आणि नवबौद्ध स्मारक तथा बहउद्देशीय समिती, घुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषाः
दिवस पहिलाः सोमवार, २६ जानेवारी २०२६
सकाळी ११:३० वा. (प्रथम सत्र): धम्म संमेलनाचे उद्घाटन व धम्मदेशना पूज्य भंतेजी मेधंकर महाथेरो आणि पूज्य भंते रत्नमणी थेरो यांच्या हस्ते होईल.

द्वितीय सत्रः सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. रितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संविधानासमोरील आव्हाने आणि डॉ. बाबासाहेबांचे संघटन कार्यावर तज्ज्ञ वक्त्यांचे (अॅड. अभय लोखंडे व प्रा. डॉ. प्रमोद नारायणे) मार्गदर्शन होईल.

सायंकाळी: केंद्रीय शिक्षिका गायत्रीताई रामटेके यांचा ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर होईल.

रात्री ६:०० वा.: इंजि. पवन महाराज दवंडे (अमरावती) यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.

दिवस दुसराः मंगळवार, २७ जानेवारी २०२६

सकाळी ११:३० वा.: उ‌द्घाटन मा. प्रविण खोब्रागडे यांच्या हस्ते होईल. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून मुख्याधिकारी निलेश रांजनकर, मा. सब्यासाची डे दे, मा. सत्यनारायण दिगांमर्थी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.

नगराध्यक्ष दिप्ती सुजित सोनटक्के व नवनियुक्त नगरसेवकांचा सन्मान सोहळा संपन्न होईल.

दुपारी २:३० वा.: महिलांच्या हक्कांवर आधारित सत्रात मा. वैशालीताई डोळस (औरंगाबाद) आणि मा. जगदिश गवई मार्गदर्शन करतील.

सायंकाळी ४:०० वा.: ‘कल्याणकारी राज्याची संकल्पना’ या विषयावर मा. शेख सुभान अली साहेब आणि मा. डॉ. दिलीप कांबळे यांचे व्याख्यान होईल.

रात्री ६:०० वा.: सुप्रसिद्ध गायक निरज साबरी (नागपूर) यांचा भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

आयोजक व विनंतीः

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध सर्कल समितीचे सर्व पदाधिकारी तसेच नवबौद्ध स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी व दोन्ही समितीचे सदस्य गण या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेत आहे या

संमेलनाला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावे असे आवाहन आयोजकाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!