Home गडचिरोली एकल महिलांचा सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्न

एकल महिलांचा सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्न

0
275

एकल महिलांचा सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्न

कुरुळ येथे ३३२ एकल महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – शासकीय योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत

 

चामोर्शी (प्रतिनिधी) : कुरुळ येथे आयोजित करण्यात आलेला परिसरातील एकल महिला सक्षमीकरण मेळावा अतिशय उत्साहपूर्ण व सकारात्मक प्रतिसादात पार पडला.
या मेळाव्यास परिसरातील विविध गावांतून एकूण ३३२ एकल महिलांनी उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

या मेळाव्यास मा. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मा. सहाय्यक गटविकास अधिकारी मॅडम, मा. मधुकर भांडेकर, विनोद हटकर सर (CDPO), मधुकर भांडेकर, सौरभ आनंद बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, प्रभागसंघ व ग्रामसंघ पदाधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना रामटेके (तालुका व्यवस्थापक) यांनी केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर हरडे (ग्रामपंचायत अधिकारी) यांनी मांडले.

मार्गदर्शनपर भाषणात गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी एकल महिला समावेशन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना शासकीय योजना प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन केले. येरमे मॅडम मॅडम, मा. मधुकर भांडेकर, हटकर सर (CDPO), तुषार कर्णे, सौरभ आनंद, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक, विनोद मडावी (सरपंच) यांनी एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणावर सविस्तर मार्गदर्शन केले.

मेळाव्याचा मुख्य उद्देश एकल महिलांबाबत असलेल्या अन्यायकारक सामाजिक रूढी–परंपरा मोडीत काढणे, महिलांना स्वावलंबी बनवणे, उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ थेट देणे हा होता. उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष लाभ प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बोलताना मा. गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ म्हणाले,
“ _एकल महिला या समाजाचा दुर्लक्षित घटक राहिला आहे. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा मेळाव्यांच्या माध्यमातून एकल महिलांना शासनाच्या योजनांशी थेट जोडून त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील काळातही अशा उपक्रमांना अधिक बळ दिले जाईल.”_
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसेवक, उमेद टीम, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका–पर्यवेक्षिका तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन परचाके मॅडम यांनी केले.
एकल महिलांसाठी आयोजित केलेला हा मेळावा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!