Home चंद्रपूर लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन…

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन…

0
103

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन…

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने प्रियदर्शनी स्कूल, घुग्घुस आणि न्यू इंग्लिश स्कूल, पांढरकवडा येथील इयत्ता १२ वीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींबाबत माहिती देणे तसेच विद्यापीठ जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा होता.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांचे स्वागत व माहितीपूर्ण मार्गदर्शन सत्राने झाली. विविध अभ्यासक्रमांतील प्राध्यापकांनी शैक्षणिक अभ्यासक्रम, करिअरच्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.
घुग्घुस येथून विद्यार्थ्यांच्या प्रयाणापूर्वी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी आणि लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहाय्यकमहाप्रबंधक सीएसआर विद्या पाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हिरवा झेंडा दाखवून त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित व यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी प्रोत्साहन दिले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसराची पाहणी करून विविध शैक्षणिक व अध्ययन सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या संपूर्ण भेटीदरम्यान दोन्ही शाळांचे कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व प्राध्यापक उपस्थित होते.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनकडून या भेटीचे नेतृत्व स्नेहा रणदिवे यांनी केले, तर श्री. निरज काळे आणि मोनिका ठाकरे यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.
ही शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरली असून, त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत स्पष्ट दिशा मिळण्यास मोलाची ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!