Home चंद्रपूर आमदार जोरगेवारांची रणनिती आणि वारवंटाही खिलले कमळ

आमदार जोरगेवारांची रणनिती आणि वारवंटाही खिलले कमळ

0
686

आमदार जोरगेवारांची रणनिती आणि वारवंटाही खिलले कमळ

इंडस्ट्रियल ईस्टेट प्रभागात भाजपचा ऐतिहासिक विजय

चंद्रपूर : इंडस्ट्रियल ईस्टेट प्रभाग म्हणजे अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि बसपाचा अभेद्य किल्ला मानला जाणारा भाग आहे या प्रभागातील सामाजिक समीकरण पक्षाच्या विरुद्ध राहिले आहे. येथे भाजपसाठी विजय मिळवणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिले होते. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी राबवलेल्या अचूक रणनितीने आणि धाडसी राजकीय खेळीने या प्रभागातील राजकीय गणितच बदलून टाकले आणि अशक्य वाटणाऱ्या ठिकाणीही कमळ फुलवून दाखवले आहे.
या प्रभागात आमदार जोरगेवार यांनी माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देत मोठा राजकीय निर्णय घेतला. हा निर्णय अनेकांना धक्का देणारा ठरला; मात्र निवडणूक निकालाने हा निर्णय किती अचूक होता, हे स्पष्ट केले. काँग्रेस–बसपाचा गड मानल्या जाणाऱ्या इंडस्ट्रियल ईस्टेट प्रभागात भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आणि प्रभागात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
या विजयात आमदार जोरगेवार यांचे कट्टर समर्थक, युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शेखर शेट्टी यांचा विजय विशेष लक्षवेधी ठरला. स्थानिक प्रश्नांची जाण, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि आमदार जोरगेवार यांचा ठाम पाठिंबा यामुळे शेखर शेट्टी यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार समर्थक म्हणून ओळखले जाणारे महेश झीटे यांनी शेवटच्या टप्प्यात वेगळी चूल मांडत एकट्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. या फाटाफुटीचा थेट फटका त्यांना बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, एकत्रित ताकद नसल्याने त्यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे.
एकूणच, इंडस्ट्रियल ईस्टेट प्रभागातील हा निकाल म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजकीय दूरदृष्टीचा, योग्य वेळेला घेतलेल्या निर्णयांचा आणि अचूक रणनितीचा विजय आहे. पारंपरिक विरोधी पक्षांचा किल्ला उद्ध्वस्त करत भाजपचा झेंडा रोवण्यात आमदार जोरगेवार यशस्वी ठरले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!