Home गडचिरोली प्रथम पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत श्वेता भास्कर कोवे, अनु रघुपती नैताम व...

प्रथम पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत श्वेता भास्कर कोवे, अनु रघुपती नैताम व मिथुन परशुराम मडावी या सर्वांची पटियाला (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

0
119

प्रथम पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत श्वेता भास्कर कोवे, अनु रघुपती नैताम व मिथुन परशुराम मडावी या सर्वांची पटियाला (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

 

चामोर्शी l सुखसागर झाडे

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी ला सी. एम. इंटरनेशनल स्कूल बानेर, पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या 1 ली पॅरा राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत कंपाउंड व इंडियन राउंड या प्रकारात गडचिरोली ज़िल्यातील श्वेता भास्कर कोवे, अनु रघुपती नैताम व मिथुन परशुराम मडावी या सर्वांनी वैयक्तिक रौप्य पदके पटकावून वरील सर्व विजयी धनुर्धर खेळाडूंचे ( पद्मश्री अवार्डी ) श्री. मुरलीधर पेटकर यांचा शुभ हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, श्रीराज बदोले, नाजूक उईके, सुप्रसिद्ध बडकेलवार, गड़चिरोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव डॉ. श्याम कोरडे, सुशील अवसरमोल, पायलेट प्रोजेक्र्ट धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक रोशन सोळंके, कु. कौमुदी श्रीरामवार, हिमालय शेरखी व पालकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!