Home गडचिरोली न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट चामोर्शीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट चामोर्शीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

0
137

न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट चामोर्शीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

चिमुकल्यांनी आपल्या सुप्त-लुप्त कलांची उधळण करीत उपस्थितांची मन जिंकली

चामोर्शी – सुखसागर झाडे

चामोर्शी;- येथील न्यू माऊंट कॉन्व्हेन्ट चामोर्शीचा २०२५ – २०२६ वार्षिक स्नेहसंभेलन सोहळा, विविध कार्यक्रमाने नगर पंचायत येथील सभागृहात चिमुकल्यांच्या कला गुणाने प्रमुख पाहुण्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

माता सरस्वती, विद्येचे जनक, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेक थोर महात्म्यांना फोटोला मलारपण व दीप प्रज्वलन सह अभिवादन करीत कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. नवीन वर्षाच्या पर्वावर नववर्ष उत्सव साजरा करण्याचे हेतूने 1/1/26 रोजी सकाळी 9 वाजता पासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन समोर स्थित न्यू माउंट कॉन्व्हेन्ट शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांचे शालेय क्रीडा घेण्यात आले, त्यानंतर 2/1/26 रोजी ला नगर पंचायत सभागृहात चिमुकल्यांच्या सुप्त कला गुणाना वाव मिळावा म्हणून सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत उपस्तीताना मंत्रमुग करणाऱ्या बालगोपालांच्या विविध वेशभूषातून नाच गाण्याचा सुंदर आनंददायी कार्यक्रम घेण्यात आला. तीन दिवसीय घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे शेवटच्या 3/1/26 ला तारखेला शाळेची सजावट करून स्नेह भोजनाचा आस्वाद घेत नववर्ष उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद चामोर्शी येथील नगराध्यक्ष मान. सौ. जयश्रीताई वायलालवार , उपाध्यक्ष तथा विद्यमान नगर सेवक मान. राहुलभाऊ नैताम, नगर सेविका नगर परिषद चामोर्शी मान. सौ. वर्षाताई वैभव भिवापूरे, मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष तंटामुक्ती समिती मान. सुभाषचंद्र कर्णे, नगर सेवक निशांत नैताम सामाजिक कार्यकर्ते तथा पालक प्रतिनिधी वासुदेव चिचघरे, पालक प्रतिनिधी श्रीकांत नैताम, संस्थापक मान. तुषारजी कर्णे ,संस्थापक दुर्योधनजी घोंगडे , सौ. दिव्या तुषार कर्णे, सौ. दर्शना दुर्योधन घोंगडे, सौ. शुभांगी सातपुते, अंबिका कनकुटलावार मुख्याध्यापिका, श्री. रमेश कनकुटलावार, सुचिता राम अवताडे, अश्विनी सचिन कनकुटलावर, प्रियांका साईनाथ यारावर, शोभा भास्कर सोरते, आदी मान्यवर अनेक पालक नागरिक, व बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यू माउंट कॉन्व्हेन्ट शाळेच्या माध्यमातून उत्तम विद्यार्थी घडत असून शिक्षणाचा पाया चांगला असल्याचे अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संस्थापक तुषार कर्णे यांनी केले व तर संचालन सौ. शुभांगी सातपुते यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कनकुटलावार मॅडम यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील सर्व शिक्षक व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्याबद्दल शाळेचे संस्थापक दुर्योधन घोंगडे यांनी सुद्धा शाळेच्या शिक्षकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!