Home गडचिरोली मार्शल आर्ट असोसिएशन नागपूर इंडिया कराटे द्वारा बेल्ट परीक्षेचे आयोजन

मार्शल आर्ट असोसिएशन नागपूर इंडिया कराटे द्वारा बेल्ट परीक्षेचे आयोजन

0
585

मार्शल आर्ट असोसिएशन नागपूर इंडिया कराटे द्वारा बेल्ट परीक्षेचे आयोजन

बेल्ट परीक्षेत अनेक बाल कराटे पटूची निवड

सेन्साई चंदनखेडे यांची उत्कृष्ट अशा मार्गदर्शनातून बाल कराटे पटूना घडवण्यात सिंहाचा वाटा

चामोर्शी/सुखसागर झाडे :-आज दिनांक 4/01/2026 रोज रविवारला शिवाजी माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शीच्या पटांगणावर मार्शल आर्ट असोसिएशन नागपूर, इंडिया कराटे द्वारा बेल्ट एक्झाम घेण्यात आली त्यामध्ये माता इंडियाचे अध्यक्ष सिहान विपिन हाडके, माता इंडिया चे सचिव सिहानअजय मोंढे , माता इंडियाचे उपाध्यक्ष आशिष नागदेवते, चामोर्शी तालुका क्रीडा प्रमुख राकेश खेवले तसेच पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्यामध्ये प्रावीण्यता मिळवली आणि यशाचे श्रेय प्रशिक्षक सेन्साई धनराज चंदनखेडे व त्यांच्या पालकांना त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने चामोर्शी शहरात शिवाजी शाळेमध्ये नियमित प्रशिक्षण दिले जात आहे भविष्यामध्ये हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून आपल्या शहराचा नाव उज्वल करतील असा एक उद्देश्य आहे. तरी आपल्या शहरातील इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यायचे असल्या संपर्क साधून प्रशिक्षण घेण्यास येऊ शकतात.
या बेल्ट एक्झाम मध्ये ब्लू बेल्ट, रेड बेल्ट, येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, आणि ग्रीन बेल्ट या बेल्टची एक्झाम सर्व विद्यार्थ्यांनी दिली. त्यामध्ये ब्लू बेल्ट मध्ये क्रिश वनेवार, पल्लवी देवगिरीकर, अक्षित वासेकर. रेड बेल्ट मध्ये आदित्य कडाम, मृण्मय कडाम. येलो बेल्ट मध्ये हर्षित परेरा, संचिता डोंगरे, गणेश बलमवार, प्रियांशी वाकडे, शुभ्रा भसारकर, यश भुरसे, परिधी मस्के. ऑरेंज बेल्ट मध्ये यशस रायपुरे, यावेद पिपरे, क्रिश धोडरे, रोनित सलामे, अनुज साना. तसेच ग्रीन बेल्ट मध्ये सम्राट सहारे, नेहाल मेल पुरवार, निशांत पाल, अवनी चंदनखेडे या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत Cake संपादन केल्या बद्दल सर्व स्तरातून खूप खूप अभिनंदन वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!