फसव्या ओला दुष्काळ शासन निर्णयाविरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने “जीआर होळी” आंदोलन
चंद्रपूर:- राज्य सरकारने ओला दुष्काळाबाबत जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. दिनांक ०९ व १० ऑक्टोबर २०२५ च्या शासननिर्णयात केवळ आकड्यांची हेराफेरी केली असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका देखील मदतीपासून वगळला आहे. जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचे सातबारा बंद करण्याचे आदेश तहसीलदार देत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक १६ ऑक्टोबरला २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे. दुपारी १२:०० ते २:०० वाजताच्या दरम्यान हे आंदोलन असणार आहे.या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तसेच कार्यकर्ते,पदाधिकारी, ज्जेष्ठ नेते या सर्वांनी सहभागी होऊन निषेध नोंदवावा असे आवाहन ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात ॲड. दीपक चटप, निळकंठराव कोरांगे, शेषराव बोंडे,सुनील बावणे,रमाकांत मालेकर,ॲड.प्रफुल आस्वले, शबीर जहागिरदार, सुदाम राठोड, दत्ता राठोड, गणेश कदम, बालाजी कांबळे,मधुकर चिंचोळकर, रामकृष्ण सांगळे, ॲड. श्रीनिवास मुसळे, सुदाम राठोड, दिलीप देठे, कपिल इद्दे, मनोज कोपावार, अमोल देवाळकर, व्यंकटेश मल्लेलवार, प्रसाद राव आदींनी केले आहे.








