“मानवविद्येतील उच्च शिक्षणातून खुल्या होत आहेत नव्या रोजगार संधी” – शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शी येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
चामोर्शी (14 ऑक्टोबर 2025) : शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शी येथे “मानवविद्येतील उच्च शिक्षणातून खुल्या होत आहेत नव्या रोजगार संधी” या विषयावर एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. शिल्पा काशेट्टीवार मॅडम यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पंकज नरुले सर, शिवाजी महाविद्यालय, चामोर्शी हे उपस्थित होते.
मार्गदर्शन सत्रात बोलताना डॉ. नरुले सर यांनी मानवविद्या म्हणजे केवळ पारंपरिक अभ्यासक्रम नव्हे, तर त्यातून नव्या स्वरूपाच्या व्यावसायिक, सामाजिक व शैक्षणिक संधी कशा निर्माण होत आहेत, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी डिजिटल मीडिया, संशोधन, लेखन, भाषांतर, मानसशास्त्र, समाजकार्य, कार्पोरेट कम्युनिकेशन, प्रशासन इ. क्षेत्रातील रोजगाराच्या विविध वाटा उलगडून दाखवल्या.
त्यानी उच्च विद्याविभूषित करण्यासाठी विविध नामांकित विद्यापीठ राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कसा प्रवेश घेऊन उज्वल भविष्य कसं घडवितां येणार, जातिनिहाय विविध स्कॉलरशिप तथा फेलोशिप चा फायदा कसा घेता येईल या बाबत सविस्तर विस्तृत असं मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. शिल्पा काशेट्टीवार मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मानवविद्येचा अभ्यास केल्यास केवळ ज्ञान मिळते असे नाही, तर संवेदनशील नागरिक घडतात. या क्षेत्रात नव्या पिढीसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत.”
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनीने आपल्या डोक्यात असलेल्या शंका मार्गदर्शकांसमोर मांडत संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितेश सावसाकडे यांनी केले. प्रा. नोमेश्वर झाडे कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मानवविज्ञान विभाग, राष्टीयत सेवा योजना विभाग तर्फे करण्यात आले होते. यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींचा मोलाचा सहभाग लाभला.
हा कार्यक्रम विद्यार्थिनींमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या शक्यतांबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला.









