शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात शैक्षणिक एबीसी आयडी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
चामोर्शी, (११ ऑक्टो.) सुखसागर झाडे
स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथे आज “एबीसी आयडी मार्गदर्शन कार्यक्रम” उत्साहात पार पडला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत ‘अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ (ABC) या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. शिल्पा काशेट्टीवार या होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून , मा. प्रवीण मडावी सर प्राचार्य जागेश्वर सावकार गण्यारपवार महाविद्यालय घोट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एबीसी आयडी म्हणजे काय, त्याचे फायदे, वापराची प्रक्रिया आणि भविष्यातील शैक्षणिक प्रवासात त्याचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शन सत्रात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले शंकात्मक प्रश्न उपस्थित करून मार्गदर्शक यांचे कडून निराकरण करून घेतले. कार्यक्रमाचे आ
संयोजक महाविद्यालयातील सहा. प्रा. नितेश सावसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवे शैक्षणिक तंत्र समजून घेण्याची आणि डिजिटल प्रणालीचा उपयोग करून स्वतःच्या शैक्षणिक भविष्याकरिता योग्य दिशा निवडण्याची जाणीव निर्माण करून देण्यात आली. असे मत उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितेश सावसाकडे, आभार प्रदर्शन सहा. प्रा. नोमेश्वर झाडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.






