Home मुंबई मराठी उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठी नव उद्योजकांसाठी उपक्रम

मराठी उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठी नव उद्योजकांसाठी उपक्रम

0
137

मराठी उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठी नव उद्योजकांसाठी उपक्रम

 

मुंबई प्रतिनीधी : महेश कदम

मराठी उन्नती सामाजिक संस्था, मुंबई (मराठी उद्योग समाज) यांचा साठ्ये कॉलेज, विले पार्ले येथे नुकताच तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. करोना काळामध्ये छोट्या-मोठ्या मराठी व्यावसायिकांना विक्रीसाठी मदत व्हावी आणि त्यांच्या व्यावसायाला चालना मिळावी या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष श्री. सुहास तावडे, कार्याध्यक्ष श्री. सहदेव सांवत, सरचिटणीस श्री. विनायक सुर्वे, तसेच समाजसेविका श्रीमती आशाताई परब यांच्या संकल्पनेतून एक व्हाॅट्स ॲप ग्रुप चालू करण्यात आला होता, बघता बघता सर्व क्षेत्रातील आठशे ते नउशे लहान-मोठे व्यावसायिक त्या ग्रुप वर जोडले गेले, करोना काळ संपताच या समुहाद्वारे दिवाळी सणानिमित्ताने विरार येथे भव्य विक्री मेळावा देखील आयोजित केला, अंधेरी पुर्व रेल्वे हाॅलमध्ये गणपती सणानिमित्त विक्री मेळावा आयोजित करून व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले असे बरेच लाहान मोठे उपक्रम राबविण्यात आले. ग्रुप च्या माध्यमातून व्यावसायिकांना मिळत असलेला लाभ आणि त्यांचा प्रतिसाद पाहून संस्था नोंदणीकृत करुन वर्धापन दिनानिमित्त नव व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, विशेष अतिथी म्हणून लाभलेले लाॅजिस्टीक क्षेत्रात परदेशात देखील आपला व्यवसाय वाढविणारे जेष्ठ उद्योजक मा.श्री. सुरेश कदम, आयात-निर्यात उद्योजक श्री. दिपक परब, नामांकित बांधकाम उद्योजक श्री. जगन्नाथ मोरे, फार्मा उद्योजक श्री. संदीप तावडे, सी.ए. श्री. संतोष घाग, जनकल्याण सहकारी बँकेने अध्यक्ष श्री. संतोष केळकर, समाजसेविका उद्योजिका सौ. उल्का विश्वासराव या सर्व मान्यवरांनी उपस्थितीतांना त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील अनुभव सांगुन मार्गदर्शन केले, विषेश करून तरुणांना व्यावसाय वाढीसाठी आपण निश्चितच सहकार्य करु असे आश्वासन देण्यात आले.
मा.श्री. प्रदिप सावंत जिल्हा प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांनी व्यावसाय संबधित महाराष्ट्र शासनाची धोरणे व योजनांची माहिती दिली तथा त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सोबतच मुंबई जिल्हा सह. बॅकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. संदिप सुर्वे यांनी मुंबई बॅकेंच्या, व्यावसायिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देऊन सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात नव व्यावसायिकांना देखील सन्मान चिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले. संस्थेचे सरचिटणीस श्री. विनायक सुर्वे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची ध्येय धोरणं सांगितली. कार्याध्यक्ष श्री. सहदेव सावंत यांनी व्यावसायिकांनी संस्थेचे सभासदत्व घेउन संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत. अध्यक्ष श्री. सुहास तावडे यांनी अनुकूल परिस्थिती मध्ये देखील आम्ही आमचा व्यवसाय कसा वाढविला याचे अनुभव सांगुन प्रोत्साहित केले. उपाध्यक्ष श्री. अनिल कदम यांनी मराठी तरुणांनी काॅर्परेट आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रा संबंधित व्यावसाय करणे देखील आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या मध्ये मार्केटिंग कला अवगत करणे महत्त्वाचे आहे आणि लवकरच संस्थेच्या वतीने त्या संबंधित मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, जिएसटी अधिकार्यांचे मार्गदर्शन कार्यक्रम त्याचबरोबर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेच्या वतीने उपक्रम राबविण्यात येणार असून व्यावसायिकांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या व्यावसायाला चालना द्यावी असे संबोधले. संस्थेचे मार्गदर्शक/ पदाधिकारी श्री. सुभाष दरेकर साहेब हे भारतीय सेने मध्ये सुभेदार पदावर देशसेवा करुन निवृत्ती नंतर बँक आणि खाजगी कार्यालयात खाजगी सुरक्षा पुरविण्याचा यशस्वीपणे व्यावसाय देखील करत असल्याने आमच्या साठी ते नक्कीच प्रेरणादायी आहे म्हणून त्यांचे अभिनंदन करुन विशेष अतिथींचे आभार मानले. त्याचबरोबर सर्व व्यावसायिक उपस्थितांचे आभार मानुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सागंता करण्यात आली. संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांनी विषेश करून श्री. विकास राणे, श्री. शैलेश माने, श्री. सुर्यकांत बावकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!