स्वच्छता मोहीम व स्वच्छता कर्मचारी सत्कार…
मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
स्वच्छता अभियान निमित्त कार्यसम्राट आमदर श्री. कालिदास कोळंबकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सेवा पंधरवधा अंतर्गत कबुतर खाना भवानी शंकर मार्ग दादर प येथे स्वच्छता मोहीम मनपा जी उत्तर विभाग यांच्या संलग्न संपन्न झाला. हिरकणी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळात सर्व मनपा स्वच्छता कर्मचारी व अधिकारी व पोलीस शिपाळी यांचा द म मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रज्ञा ताई भिडे, भाजपा पदाधिकारी सौ अनघा चांगले मॅडम, श्री राधिका मॅडम,श्री दादा शिसेकर, श्री राजू भाई सावला, श्री अमित वर्मा, श्री जितेंद्र गुप्ता, श्री ओमकार गुरव, श्री स्वप्नील झेंडे, श्री यश विलणकर या मुख्य सहकार्याच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार झाला. हा सत्कार सेवेसोबत समाज्यातील दृष्ट वृत्ती दृष्टी आघाडी मिळवून सकारात्मक समाजसेवा करून जनतेचे समाधान पाहणाऱ्या वर्गाचा खऱ्या अर्थाने झालेला सन्मान आहे हि आयोजनाची संधी समाज्यात काम करताना नेहमीच बळ देते प्रसंगी उपेक्षित घटका पासुन सामान्य जनमाणसा पर्यंत सामानता राखणे हि पंतप्रधान मोदीजीची भावना सेवा धर्म सर्वांच्या अंगीकृत झाला पाहिजे असा उत्कृष्ट संदेश या कार्यक्रमच्या माध्यमातून बहरला, ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री जितेंद्र कांबळे. (भाजपा द म मुंबई जिल्हा सदस्य) यांनी केले.




