चंद्रपूर जिल्हा प्रशासन भाजप-आरएसएसचे एजंट झाले आहे का? जिल्हाध्यक्ष AAP
काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्णत्वानिमित्त चंद्रपूर पोलिस ग्राउंड येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार हे प्रत्यक्ष उपस्थित राहून, संघाच्या कार्यकर्त्यांसमवेत सलामी देताना दिसले.
हे केवळ उपस्थित राहणे नव्हते – तर संविधानिक पदावर बसलेला अधिकारी थेट आरएसएसच्या आदेशाला सलामी ठोकत होता.
हे वर्तन स्पष्ट दाखवते की चंद्रपूरचे प्रशासन आता निष्पक्ष नसून थेट संघ-भाजपचे एजंट म्हणून काम करत आहे.
याच कार्यक्रमात चंद्रपूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार हे RSS च्या युनिफॉर्ममध्ये, हातात दंडा घेऊन परेडमध्ये सहभागी झाले. शासकीय नोकरीवर असूनदेखील त्यांचा हा सहभाग हे दाखवतो की ते RSS चे सक्रिय सदस्य आहेत.
लोकशाही व्यवस्थेमध्ये शासकीय अधिकारी हे जनता आणि संविधान यांना उत्तरदायी असतात. मात्र, आता असे चित्र दिसते की:
शासकीय अधिकारी थेट संघटित राजकीय गटाला सलामी देतात.
प्रशासनावर आरएसएसची पकड आहे.
अधिकारी लोकशाहीच्या चौकटीत न राहता संघाच्या गुप्त आदेशावर काम करत आहेत.
याआधीच मागील विधानसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदार याद्यांबाबत गंभीर प्रकरण उघडकीस आले होते, ज्यात चंद्रपूर जिल्हा प्रशासनावर भाजपाला समर्थन करण्याचे आरोप झाले व कारवाईला उघडपणे दिरंगाई केली गेली.यात हेच अधिकारी तर नव्हते ना असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता हे अधिकारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम करतील व प्रशासनातून भाजपाला अनुकूल वातावरण निर्माण करतील, अशी ठोस शंका आहे.
हा प्रकार लोकशाही व संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर प्रहार करणारा आहे.
आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडे ठामपणे विचारते की:
1. जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आणि सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार यांच्यावर कारवाई कधी होणार?
2. शासन आणि प्रशासन संघाचे कार्यालयीन अंग झाले आहे का?
3. अधिकारी हे लोकांचे सेवक आहेत की आरएसएसचे एजंट?
4. येणारे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी ला लक्षात घेता या अधिकाऱ्यांना नागरिकांची संपर्क येणाऱ्या व्यवस्थेतून तात्काळ दूर करावे.
लोकशाहीवर गदा आणणाऱ्या अशा संघटनात्मक दबावाला आम्ही विरोध करतो आणि जनता याला उत्तर देईल.








