Home चंद्रपूर शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार!

शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार!

0
133

शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार!

आम्हाला हमीभाव द्या ; नाहीतर प्रशासन व लोकप्रतनिधीं विरोधात आक्रमक

 

आशिष गजभिये
चिमूर

तालुक्यातील अनेक भागात विविध परिसरात सोयाबीन,कापूस धान,तुर,हळद या पिंकावर या खरीप हंगामात वातावरणाच्या बदलामुळे अनेक रोगांनी आक्रमण केलं.यात सर्व शेतकऱ्यांना हाती आलेलं उत्पन्न गमव्हाव लागलं. यात शेतकरी हवालदील झालेले आहेत.यात सरकार कडून केव्हळ आश्वासन देण्यात येत आहेत.या विरोधात आता सर्व शेतकरी यांनी एकजूट करून एल्गार उभारला आहे.

यातच अतिवृष्टी मुळ झालेल्या नुकसान ची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पालकमंत्री व लोकप्रतिनिधी,प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी खानगाव बोथली परिसरात पाहणी केली यात एका शेतकऱ्याने संबंधितांना निवडणुकीपूर्वी केलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासंदर्भात विचारणा केली होती. या वर त्यांना संतापांचे बोल एकावे लागले होते. यात सर्व शेतकरी वर्गाने एकत्र होऊन आता आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.

याचाच भाग म्हणून सर्व शेतकरी यांच्या पुढाकाराने खडसांगी येथील मांनिका सभागृहात सर्व शेतकऱ्यांनी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी ओला दुष्काळ,वन्यप्राणी नुकसान ,वावर ,हल्ले,पीक विमा,योग्य हमीभाव आणि नुकसान भरपाई निकष या विषयी बैठक निर्माण केली होती यात सर्वानुमते शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
या सभेला माजी राजयमंत्री व शेतकरी नेते ओमप्रकाश कडू यांनी भ्रमणध्वनी वरून संबोधित केले. त्याच प्रमाणे माजी पस सदस्य अझहर शेख, बबलू थुटे,सरपंच लोकनाथ रामटेके,माजी उ. प.प्रमोद श्रीरामे,रवींद्र शेंडे,जगदीश मेश्रम,विनोद उमरे आदींनी मार्गदर्शन करून सर्व शेतकरी यांच्या पुढाकारातून भव्य आंदोलन उभारण्याचा निर्धार केला.या वेळी खडसंगी परिसरात प्रशासनानं व शासणाविरोधत शेतकऱ्यांच्या न्याय व हक्का साठी भव्य आंदोलन करण्याचा निर्धार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!