नवचेतना बांधवांतर्फे मद्यपाश आजारावर जनजागृती
घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्गदर्शन
घुग्घुस येथे फ्रीडम आंतर समुह चंद्रपूर अंतर्गत नवचेतना समुह घुग्घुस, यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्यपाश आजारावर जनजागृती करण्यात आले.
मद्याचे व्यसन सोडण्यासाठी कोणताही खर्च न करता मदत मिळू शकते, हा संदेश देण्यासाठी ‘अल्कोहोलिक्स अनॅनिमस’ (एए) तर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी (ता. १) राज्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये मोफत जनजागृती केंद्र उभारले जाणार आहेत,” अशी माहिती ‘अल्कोहोलिक्स अनॅनिमस’चे मुकुंद के., राजीव एस., हर्षद जी. आणि इम्रान एस यांनी मंगळवारी (ता. ३०) पत्रकार परिषद पुण्यात करण्यात आली.
दर सोमवारी व शुक्रवार रोज वेळ सां.७ ते ८ वाजेपर्यंत जनता विद्यालय घुग्घुस येथे करण्यात आली आहे.
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. निलेश पडगीलवार तसेच कर्मचारी व नवचेतना समुहाचे बांधव योगेश एन, केशव टि, रामु पी, तुलसीदास कुंभारे, मंगेश, अमोल, श्याम, योगेश बी, श्यामराव, अजय, प्रदीप, गुड्डू, बंडू, राजू आदी उपस्थित होते.








