Home चंद्रपूर पांढरकवडा गावातील पानटपरी परिसरात चाकू हल्ला

पांढरकवडा गावातील पानटपरी परिसरात चाकू हल्ला

0
789

पांढरकवडा गावातील पानटपरी परिसरात चाकू हल्ला

प्रेम प्रकरणातून वाद निर्माण झाल्याचा संशय…

 

घुग्घुस शहरापासुन अंदाजे ५ किलोमीटर अंतरावरील असलेल्या पांढरकवडा गावात येथील पानटपरी परिसरात दि. १४ सप्टेंबर २०२५ रविवार सकाळ १० वाजताच्या सुमारास प्रेम प्रकरणाच्या वादातून आरोपी इसमाने युवकावर चाकुने हल्ला केल्याची घटना घडली.

आरोपी इसम व जखमी युवक जवळपास शेजारी आहेत. आरोपीच्या नात्यातील महीले सोबत प्रेम संबंध होते. आरोपींनी बरेच वेळा युवकाकडे कानाडोळा करीत होता. आरोपी श्रीधर झोडे (६२) वर्ष यांनी मारोती बरडे (३२) वर्ष याला चाकूने हल्ला चढविला. यात मारोती गंभीर जख्मी झाला. त्याला लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथील नेण्यात आले. तसेच प्राथमिक उपचार करण्यात येऊन जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

आरोपी श्रीधर झोडे यांनी स्वतः पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली असता पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक केली. या घटनेचा तपास एपीआय पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!