पांढरकवडा गावातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून चोरी…
घुग्घुस पोलीस ठाणे हद्दीतील पांढरकवडा गावातील दि.१४ सप्टेंबर रविवार रात्री बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम काही अज्ञात आरोपीने फोडल्याची घटना आज दि. १५ सप्टेंबर सोमवार ला सकाळी उघडकीस आली.
घुग्घुस चंद्रपूर मार्गावर अंदाजे ५ किलोमीटर अंतरावर पांढरकवडा गावातील भर रस्त्यावरच्या परिसरात एटीएम मशीन आहे. या अगोदरही येथील एटीएम मशीन फोडून चोरी झाल्याचे नागरिकांकडून बोलण्यात येत आहे. आताही अंदाजे दहा लाखांहून अधिक रक्कम एटीएम मशीन फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
अशा घटना घडत असताना सुद्धा एटीएम सुरक्षा कर्मचारी नियुक्त नाही! यामुळे चोरट्यांना मोकळे रान मिळत असून एटीएम फोडण्याचा घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लीहितेस्तोवर घटनेचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे.








