Home चंद्रपूर इंडियन गॅस मध्ये काम करणाऱ्या कामगाराची गळफास लावून आत्महत्या..!

इंडियन गॅस मध्ये काम करणाऱ्या कामगाराची गळफास लावून आत्महत्या..!

0
218

इंडियन गॅस मध्ये काम करणाऱ्या कामगाराची गळफास लावून आत्महत्या..!

घुग्घूस :- येथील एका विवाहित इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नावं रामू परतेती असे आहे.

रामू परतेती हा इंडियन गॅस येथे काम करीत असून तो दिनांक 09 सप्टेंबरला सिलेंडर भरण्यासाठी शेणगाव फाट्याजवळ असलेल्या इंडियन गॅस च्या गोदाममध्ये गेला व ऑटो उभा ठेवून त्याने गोदामच्या मागे असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.आत्महत्येचे कारण अस्पस्ट असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!