Home चंद्रपूर सात संचालक बरखास्तीच्या धर्मदाय आयुक्त नागपूर यांच्या आदेशाला उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ...

सात संचालक बरखास्तीच्या धर्मदाय आयुक्त नागपूर यांच्या आदेशाला उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ नागपूरने दिली स्थगिती

0
482

सात संचालक बरखास्तीच्या धर्मदाय आयुक्त नागपूर यांच्या आदेशाला उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ नागपूरने दिली स्थगिती

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराच्या जुन्या कार्यकारणीला अभय…

राजुरा :- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराच्या संस्थेमध्ये वाद निर्माण होऊन जसविंदरसिंग घोतरा विरुद्ध सर्व सात संचालक मंडळ असून यांनी 2020 मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त नागपूर यांच्याकडे 41 डी केस दाखल केली होती. या केस मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी दिनांक 8 ऑगस्ट 2025 ला आदेश पारित करून संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. व याच संचालकांनी संस्थेचे तात्पुरती कार्यकारी बॉडी तयार करून कार्य करावे असे आदेश केले होते. परंतु या आदेशाला संस्थेचे सर्व सातही संचालकांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ नागपूर येथे आव्हान दिले असता न्यायालयांनी सह धर्मदाय आयुक्त नागपूर यांच्या आदेशाला पुढील तारीख पर्यंत आज (दिनांक 9 सप्टेंबर 2025) ला स्थगनादेश दिला. यामुळे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे संचालक मंडळ कायम आहे. या निर्णयामुळे संस्थेचे सर्व शाळा महाविद्यालय कर्मचारी यांना संस्थेच्या कामकाजा विषयी दिलासा मिळाला आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा केस मध्ये जॉईंट चॅरिटी कमिशनर नागपूर यांनी दिनांक 8 ऑगस्ट 25 च्या आदेशाला अंतरिम स्थगनादेश उच्च न्यायालय नागपूर यांनी फर्स्ट अपील केस क्रमांक 1125/2025 मध्ये अंतरिम स्थगनादेश दिला. यामुळे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मंडळ कायम असून पुढील तारीख पुढचे सुनावणीसाठी ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अविनाश जाधव यांनी पत्रकारासोबत बोलताना दिली.

माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या अथक परिश्रमातुन नावारूपाला आलेली आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा या संस्थेचा वाद त्यांच्या निधनानंतर फेब्रुवारी २०२० पासून संयुक्त धर्मदाय आयुक्त, नागपूर यांच्या न्यायालयात पोहचला. या संस्थेच्या अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि आश्रमशाळा सुरू आहेत.

जाईंट चॅरिटी कमिशनर, आयुक्त नागपूर यांच्या न्यायालयात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांच्या कलम ४१-डी (१) (अ) (क) (ड)(ई) अंतर्गत संबंधित वाद मागील सहा वर्षापासून सुरू होता. जाईंट चारीटी कमिशनर, आयुक्त नागपूर यांच्या आदेशाला आज उच्च न्यायालयाने स्थगानादेश दिल्यामुळे संस्थेचे सातही पदाधिकारी सुधाकर कुंदोजवार, श्रीधरराव गोडे, अविनाश जाधव, दत्तात्रय येगीनवार, अँड. संजय धोटे, दौलत भोंगळे आणि साजिद हुसैन बियाबानी हे सात संचालक कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!