Home चंद्रपूर जश्ने ईद ए मिलादुंनबी निमित्त मुस्लिम युथ मुव्हमेंट तर्फे भव्य रक्तदान शिबीर

जश्ने ईद ए मिलादुंनबी निमित्त मुस्लिम युथ मुव्हमेंट तर्फे भव्य रक्तदान शिबीर

0
200

जश्ने ईद ए मिलादुंनबी निमित्त मुस्लिम युथ मुव्हमेंट तर्फे भव्य रक्तदान शिबीर

राजुरा (दि. 05 सप्टेंबर 2025) – पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिन जश्ने ईद ए मिलादुंनबी या पवित्र दिवसाचे औचित्य साधून मुस्लिम युथ मुव्हमेंट, राजुरा तर्फे समाजबंधिलकी जपत एक प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात आला. शहरातील द ज्यूस पॉइंट, राजुरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी शासकीय रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील तज्ज्ञ टीमने सहकार्य केले.

या शिबिरात राजुरा शहरातील विविध समाजघटकातील युवकांनी उत्साहाने सहभाग घेऊन ऐक्य व सामाजिक जागरूकतेचा सुंदर संदेश दिला. खोजा शिया ईशना अशरी जमात, राजुरा तसेच बामसेफ राजुरा यांनी विशेष योगदान दिले. या शिबिरात एकूण ५५ युनिट रक्तदान झाले, जे अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.

फक्त रक्तदानच नव्हे, तर शासकीय उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे रुग्णांना फळांचे वाटप देखील करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वितेमागे युथ मुव्हमेंट, राजुरा येथील कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान राहिले.

मुस्लिम युथ मुव्हमेंट, राजुरा तर्फे दरवर्षी ईद-ए-मिलादुंनबी निमित्त अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. यंदाही रक्तदान शिबीर व फळवाटप उपक्रमाने समाजात धर्मासोबत मानवतेची खरी सेवा कशी करावी याचे आदर्श उदाहरण निर्माण केले.
हा उपक्रम समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून सेवा भावनेला चालना देणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!