शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन…
राजुरा :- शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे.
सदर शिबिर 3 सप्टेंबर 2025 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत राम मंदिर, जुना बस स्टँड, राजुरा येथे आयोजित करण्यात आले आहे.
राजुरा तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना कपिल इद्दे, स्वतंत्र भारत पक्ष तालुकाध्यक्ष दिलीप देठे, शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष तर्फे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिर सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








