Home गडचिरोली आरोग्य उपकेंद्र अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात दुप्पट वाढ

आरोग्य उपकेंद्र अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात दुप्पट वाढ

0
90

आरोग्य उपकेंद्र अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात दुप्पट वाढ

शासनाने मानधनात वाढ केल्याने अंशकालीन स्त्री परिचर यांना मोठा दिलासा

 

गडचिरोली, सुखसागर झाडे:- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून मानधनात वाढ करण्यात येणार असून याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
सध्याचे तीन हजार आणि प्रस्तावित वाढ तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मासिक मानधन १ एप्रिल २०२६ पासून देण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त प्राथमिक सेवा देण्यासाठी आरोग्य सेविकासमवेत, गृहभेटी देणे, रात्रौपरात्री आरोग्य सेवा देण्यास मदत करणे, गरोदर माताना लोहयुक्त गोळया वाटप करणे, गरोदर माता शिबिर आयोजनात मदत करणे,प्रसूती तसेच पश्चत त्यांना आरोग्य सेवा देणे,कुटुंब नियोजन, तसेच इतर आरोग्य सेवा देण्यात मोलाचे सहकार्य करण्याचे कर्तव्य चोख बजावीत असतात.
अंशकालीन परिचर मानधनवाढ झाल्याने कित्येक दशके तुटपुंज्या मानधनावर कामं करणाऱ्या स्त्री परिचर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!