Home गडचिरोली रजत वाळके यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार

रजत वाळके यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार

0
54

रजत वाळके यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार

गडचिरोली, सुखसागर झाडे : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील रजत वाळके यांनी 514 वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रजत वाळके यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाबद्दल गौरव केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रजत वाळके यांचे यश प्रेरणादायी असून कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य यामुळे हे यश मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सत्कार व अभिनंदन करतांना वचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सोनलदिप देवतळे, विपुल गोरेडीवार , नवाब खा पठाण, विजय मस्के वंचित च्या महिला प्रतिनिधी उषाताई निमगडे, करिष्मा शेडमाके उपस्थित होते. यावेळी रजत वाळके यांनीही आपल्या यशामागील अभ्यासाची पद्धत आणि संघर्ष याबद्दल आपले मत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले.
त्यांच्या या यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!