Home गडचिरोली फायलेरिया च्या गोळ्या खाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

फायलेरिया च्या गोळ्या खाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

0
353

फायलेरिया च्या गोळ्या खाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे विद्यार्थी रुग्णावर उपचार सुरु

चामोर्शी, सुखसागर झाडे :- तालुक्यातील मुरखळा माल येथे हत्ती रोग दुरीकरण (फायलेरिया)आरोग्य उपकेंद्र अंतर्गत परिचारिका बोगावार , आशा वर्कर यांच्या माध्यमातून शालेय शिबीर राबवित विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप करण्यात आले. दरम्यान गोळया खाल्याने शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथील गंभीर प्रकरण समोर आले आहे. 4 दिवसा अगोदर लोकमान्य विद्यालय मुरखळा माल 1.कु.कुंजन सुकदेव टिकले वय 13 वर्ष वर्ग 8वी, 2.कु.तुषार मारोती गाडेमोडे वय 14 वर्ष, जिह्वा परिषद शाळा मुरखळा माल कु. प्रगती गणेश मंडरे वय 12 वर्ष, वर्ग 6 वी, वंश राजेंद्र चुदरी वय 8,वर्ग 2 री. भूषण दिलीप तुंबडे वय 12 वर्ष, प्रदेस रुमाजी सातपुते, वय 12 वर्ष, मानस रुमाजी सातपुते वय 10, असे मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांना व काही नागरीकांना फायलेरीयाच्या गोळ्या देण्यात आल्या त्या गोळ्या खाल्यानंतर जवळपास गावातील बहुतांश नागरीक व विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर येणे, डोके दुखणे व ताप येत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांनी दवाखान्यात उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले.
विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. परत गावातील रुग्ण ग्रामीण रुग्णालय येथे भरती होण्यासाठी येत आहेत असे चित्र दिसत होते रुग्णांची संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.दरम्यान तात्काळ डॉ. प्रवीण किलनाके शल्य चिकित्सक चामोर्शी यांचेशी संपर्क करून सदर घटनेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले कीं,सदर फायलेरिया गोळ्या खाल्यामुळे ताप वगैरे येत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र पेदाला यांच्याशी संपर्क करून हे प्रकरण त्यांच्या लक्षात आणुन दिले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम दुमपटीवार एम. ओ. लखमापूर बोरी, डॉ. पूजा बेपारी, भुरसे आरोग्य अधी. बोरगावार एल. एच. व्ही. या आरोग्य विभागीय चमुनी मुरखळा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे ताबडतोब आयोजन करून गावातील लोकांची तपासणी केल्या जात आहे.

गावातील प्रतिष्ठित नागरिक कांग्रेस चे मीडिया प्रमुख विजय लाड रुग्णांना भेट देत पालकांना धिर देत सांत्वन करीत होते.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून विषबाधा गोळ्यांमुळे झाली की आणखी काही कारण आहे यांचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलेली असुन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!