मेक ईन गडचिरोली प्रकल्पातील अगरबत्ती प्रकल्पासहीत सर्व प्रकरणाची CBI, ED किंवा SIT च्या मार्फतीने चौकशी करा..!
पुराव्यासहीत पिपरे यांची जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचेकडे मागणी
राजकीय छवी मल्लीन करण्याचे विरोधकांचे कटकारस्थान : नगरसेवक आशिष पीपरे
चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी नगरपंचायत चे नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त मांडताना म्हटले कीं, सोशल मिडीयाच्या माध्यमातून माझी व माझ्या पत्नीच्या नावाचा वापर करून विनाकारण राजकीय सुडभावनेतून माझी समाजातील पत कमी करण्यासाठी बदनामी करून समाजात माझी प्रतिमा मलीन करणा-या सर्व विरोधकांची पोलीस स्टेशन सहीत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचेकडे तक्रार केली असून त्यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविलेली असून सर्वावर दिवाणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करीत आहे असे ते माध्यमाशी बोलताना म्हटले.
गडचिरोली जिल्हयात मेक ईन गडचिरोली च्या माध्यमातून माजी आमदाराने मोठया प्रमाणात लोंकांना रोजगार उपलब्ध् करून देण्याच्या उददेशाने संपुर्ण जिल्हयात जिल्हा उदयोग केंद्र, खादी ग्रामोदयोग, बॅक आफ इंडीया आर. से. टी, बॅक ऑफ महाराष्ट्र च्या मार्फतीने मोठया प्रमाणात उदयोगयात्रा काढण्यात आली मी ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याने माझी पत्नी सौ. सोनाली आशिष पिपरे, माझी आई मायाताई अरूण पिपरे व माझ्या भावाची पत्नी उषा हरेश पिपरे यांचे अगरबत्ती उदयोबासाठी अर्ज केले व माझ्या प्रभागात श्रीनीवास दोंतुला यांनी जिल्हा उदयोग केंद्र, खादी ग्रामोदयोग, बॅक आफ इंडीया आर. से. टी, बॅक ऑफ महाराष्ट्र अधिकारी व कर्मचारी यांना बोलवून महिलांनी उदयोग करावे यासाठी माहिती व मार्गदर्शन केले व पंतप्रधान रोजगार निर्मीती आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमाच्या माध्यमातून 35% अनुदानावर काही महिला उदयोग करण्यासाठी तयार झाल्या व श्रीनीवास दोतुला यांनी सर्वांचे कर्ज प्रस्ताव बँकेला सादर केले व एक योजना तयार करून अगरबत्ती उदयोग करणा-या सर्व महीलांना सोई सुविधा व तात्रीक मदतीकरीता एका ठीकाणी सर्व महिलांनी रोजगार करावा असा रोडमॅप तयार केला व सर्वांच्या संमतीने 1 रूपया प्रती कीलो कमीशनवर मी माझ्या मालकीची जागा उदयोगासाठी दिली व माझी पत्नी सौ. सोनाली आशिष पिपरे, माझी आई मायाताई अरूण पिपरे व माझ्या भावाची पत्नी उषा हरेश पिपरे हे 3 जन या उदयोगात सहभागी असल्यामुळे मी या उदयोगासाठी सहकार्य केले मात्र तेव्हा बॅक ऑफ महाराष्ट्र चे तत्कालीन बॅक मॅनेजर अभय चौधरी यांनी श्रीनीवास दोंतुला यांनी जय हिंद कंपनीचा कोटेशन जोडला व त्यांत अगरबत्ती बनविण्याची 1 मशीन 118000 (अक्षरी एक लाख अठरा) रुपये दाखविली त्यामुळे ही मशीन मार्केट रेट पेक्षा महाग होत असल्याचे आमच्या निदर्शनास आणून दिले व गडचिरोली शहरातील अगरबत्तीचा उदयोग करणा-या सर्व महिलांना 2 लाखात फक्त 1 मशीनच दिली त्यामुळे यात काहीतरी गौडबंगाल आहे हे आमच्या बॅक मॅनेजर ने लक्षात आणुन दिले तेव्हा मशीनची वास्तवीक किंमत ईंडीयामार्ट व ऑनलाईन बघीतली असता जीएसटी पकडून 90000 (अक्षरी नव्व्द हजार ) असल्याचे आम्हाला कळले तेव्हा सर्वांच्या संमतीने 90000 (अक्षरी 90 हजार) रूपये प्रतिमशीन अश्या प्रत्येकी 2 मशीन खरेदी करण्यात आल्या व जवळपास तीन वर्ष प्रती मशीन 4 पाच टन माल काढूनसुध्दा सध्या मशीन सुस्थीत आहे व सर्वांना सर्व सुविधा कराराप्रमाणे मिळाल्याचे सर्वांनी 100 रूपयाच्या स्टॅम्प् पेपरवर हमीपत्र लिहून दिलेले आहे व अजूनही बहुतेक महिला यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे याअगोदर अनेकदा पत्रकार परीषद घेवून सांगीतलेले आहे मात्र कविता किरमे हि माझी राजकीय विरोधक असून माझ्या नगरपंचायतच्या निवडणूकीपासूनच माझ्या काही राजकीय विरोधी नेत्यांना घेवून चंद्रशेखर म्हस्के याच्या सहकार्याने माझी बदनामी करण्याचा प्रयत्न् करीत आहे परंतू कविता किरमे व चंद्रशेखर म्हस्के हे स्वत: बंटी बब्ली असून यांनी रोजवॅली व चिटफंड कंपनीच्या नावाखाली अनेक गरीबांचे आर डी च्या नावाखाली करोडोने फसवणूक केलेली आहे व यांच्या अनेंक तक्रारी सुध्दा पोलीस स्टेशनला झाल्या आहेत व त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीत कविता किरमे मोठया फरकाने पराभूत झाली व आता नैराश्येपोटी काही माझ्या राजकीय विरोधकाकडून पैसे घेऊन वारंवार खोटे नाटे आरोप करून माझी बदनामी करीत आहे. असे असतांना 3 वर्षे चाललेला अगरबत्ती प्रकल्प् बॅकेकडून सी. सी. मंजूर न झाल्याने भांडवलाच्या अभावामुळे व बॅकेंनी कच्चा मालासाठी कोणतीही मदत न केल्याने व आता (कोवीड – 19) कोरोणा महामारीनंतर डबघाईस आला व बॅकेच्या मॅनेजरच्या अज्ञानामुळे त्याचे या प्रकरणाची कोणतीही शहानीशा न करता त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जावून नियमबाहय व बेकायदेशीर पध्दतीने वसुलीसाठी तगादा लावला व महिलांच्या घरी येवून मानसिक त्रास देणे सुरू केले त्यामुळे प्रकल्पातील काही महिलांना माझ्या काही राजकीय विरोधकांनी या प्रकल्पात महिलांचा काही गहान नसतांना, हा सबसिडी लोन असतांना व याला शासनाची बॅक गॅरंटी असतांना विनाकारन घरजप्तीची च घरातील सामान जप्तीची खोटी भीती दाखवून या प्रकल्पात सहकार्य केल्याने मीच यात दोषी आहे हे व याच्यामुळेच हे सर्व घडत आहे हे या महिलांना पटवून देवून माझ्या विरोधात हा कट कारस्थान रचल्या जात आहे व काही महिण्यात नगरपंचायत चामोर्शीच्या निवडणूका आहेत मी व माझी पत्नी दोघेही नगरसेवक आहे व 60 ते 70 टक्के मतदान तेली समाजाचा आहे व मीही नगराध्यक्ष पदाचा संभाव्य उमेदवार आहे व सध्या महाराष्ट्र तैलिक महासभा या तेली समाज संघटनेचा अध्यक्ष आहे व मानवाधिकार संघटनेचा विदर्भ प्रमुख आहे व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ते सिरोंचा प्रत्येक गावात दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे माझी सामाजिक पत कमी करण्यासाठी व मला बदनाम करण्यासाठी माझ्याच समाजातील काही खेकडयामुळे व मी नुकतेच गेल्या दोन वर्षांपासून काही प्रस्थापिताच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून बाजार समिती, सेवा सहकारी व खरेदी विक्री संघाची निवडणूक लढून स्वयंघोषित सहकार महर्षीला चांगलाच पाणी पाजलेला असून त्याला सत्तेपासून दुर ठेवले आहे व निवडणुकीपासून अनेक घोटाळे बाहेर काढलेले असून यात काही मोठे नेते व तालुक्यातील एक स्वयंघोषित सहकार महषी हा दोषी आढळलेला असून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यामुळे हे सर्व घोटाळा दाबण्यासाठी व माझे लक्ष विचलीत करून माझे व माझ्या परीवाराचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी काही माझे समदुःखी विरोधक या महीलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यां महीलांना रसद व आर्थिक मदत पुरवून पडद्यामागून शकुनी मामाचे काम करीत आहे व महिलांना माझ्या विरोधात विनाकारन पेटवून माझी बदनामी करण्याचा राजकीय डाव काही राजकीय मोठे मासे खेळत आहेत मात्र मी लवकरच यांचा राजकीय पोस्टमार्टम करणार आहे व या सर्व आरोपांना न जुमानता व या सर्वांना न घाबरता जश्यास तसे उत्तर देणार असून या लढाईत संपुर्ण समाज व जनता माझ्या पाठीशी आहे.
त्यामुळेच मी स्वत: पुढाकार घेवून या सर्व प्रकरणाचे सर्व पुरावे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देऊन या प्रकरणाची चौकशी CBI, ED किंवा स्वतंत्र SIT नेमुन करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदनातून त्यांनी केलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू मांडत तसे आवाहन केले आहे.









