बातमी प्रकाशित होताच लोकप्रतिनिधींना आली जाग…
विदर्भ मिनरल अँन्ड एनर्जी प्रा. लिमिटेड च्या प्रदुषणाने नागरिक त्रस्त हि बातमी काही दिवसा अगोदर प्रकाशित होताच घुग्घुस शहरातील काही लोकप्रतिनिधी नी गांभीर्याने याकडे लक्ष वेधले असे नागरिकांत बोलण्यात येत आहे.
अनेक दिवसापासून वायुप्रदूषण होत आहे, मात्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतर १४ तारखेला घुग्घुस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व काही नगरसेवक गुप्ता पॉवर प्लांटच्या अधिकाऱ्यांशी प्रदूषणाबाबत चर्चा केली.
प्रदुषण नियंत्रण करा अथवा उद्योग बंद करा असे नगराध्यक्षा दिप्ती सुजीत सोनटक्के यांने कंपनीच्या अधिकारी श्री. आशिष नरड यांना संगीतले.
घुग्घूस शहरा लगत असलेल्या उसगाव रोडवरील विदर्भ मिनरल पॉवर प्लांट तर्फे गेल्या आठ दिवसापासून चिमणी मधून भिषण अश्या स्वरूपाचे प्रदूषण होत असल्यामुळे घुग्घूस शहरातील नागरिकांना अनेक प्रकारचे आजारांना बळी पडावे लागत असल्यामुळे नागरिकात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन घुग्घूस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के यांनी 09 फेब्रुवारी 2026 रोजी पॉवर प्लांटला पत्र पाठविले. मात्र पॉवर प्लांटच्या अधिकाऱ्यांनी पत्राला उत्तर दिले नसल्याने 14 फेब्रुवारी रोजी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उप – नगराध्यक्ष व सभापती राजुरेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे, स्वच्छता व आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी, महिला व बाल कल्याण उप – सभापती श्रुतिका लड्डू चिलका, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सुरज कन्नूर, नगरसेवक दिलीप पिट्टलवार, नगरसेविका आशा गणेश पाणघाटे, नगरसेविका पल्लवी घुले, कामगार नेते सैय्यद अनवर, बाळू चिकनकर, प्रशांत सारोकर, सुनील चिलका, अजहर शेख, गजानन मासिरकर, बंटी घोरपडे, बालकिशन कुळसंगे, महेंद्र थेरे, गणेश पाणघाटे, लड्डू चिलका यांनी कंपनीचे अधिकारी
श्री. आशिष नरड यांना प्रदूषण शेतकऱ्यांच्या समस्या व स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या मुद्यावर चांगलेच धारेवर धरले. कंपनी अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात संपूर्ण प्रदूषण संपुष्टात आणण्याची ग्वाही दिली.
तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. कंपनी सुरळीत चालू झाल्यावर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ही आश्वासन दिले. जर कंपनीने आपले शब्द पाळले नाही तर कंपनी बंद पाडू असा इशारा ही नगराध्यक्ष यांनी दिला.
आठ दिवसात कंपनीने शब्द नाही पाळल्यास, वायु प्रदुषण नियंत्रण न झाल्यास, फक्त कंपनीने रोजगार संधीच्या आश्वासन दिले का शक्य न झाल्यास नागरिकांची दिशाशूल होणार तर नाही असा परिसरातील नागरिकांकडून चर्चा करण्यात येत आहे.








