Home गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्यात निम्न वर्धा लाभ...

गोंडवाना विद्यापीठ व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्यात निम्न वर्धा लाभ क्षेत्रातील पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार

0
94

गोंडवाना विद्यापीठ व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्यात निम्न वर्धा लाभ क्षेत्रातील पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार

गडचिरोली, सुखसागर झाडे
निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने , गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात आणि पालकमंत्री वर्धा व भंडारा जिल्हा पंकज भोयर, तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामीत सदस्य प्रशांत मोहिते ,मुख्य अभियंता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर , राजेश सोनटक्के, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

पाणी वापर संस्था सक्षमिकरण व बळकटीकरणाच्या संदर्भातील या सामंजस्य करारामुळे निम्न वर्धा लाभक्षेत्रातील 66 हजार हेक्टर कृषी क्षेत्राचे प्रभावी सिंचन व्यवस्थापन अधिक परिणामकारक होऊन शाश्वत जलसंपदेच्या व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.
या सामंजस्य करारांच्या अंतर्गत निम्न वर्धा लाभ क्षेत्रातील पाणी वापर संस्थांचे प्रशिक्षण, क्षमता विकास, तांत्रिक मार्गदर्शन आणि व्यवस्थापन कौशल्ये, सामुदायिक सहभागीता वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर, जलसंवर्धन, सिंचन नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा वापर, पिक नियोजन आणि बदल, कृषी व्यवसायावर आधारित शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!