Home चंद्रपूर निलजई ऊपक्षेत्रात श्रम संहिता विषयक मार्गदर्शन

निलजई ऊपक्षेत्रात श्रम संहिता विषयक मार्गदर्शन

0
68

निलजई ऊपक्षेत्रात श्रम संहिता विषयक मार्गदर्शन

घुगुस /प्रतिनिधी :- खाण सुरक्षा महानिदेशालय श्रम मंत्रालय तथा वेकोली नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वेकोलीच्या निलजई ऊपक्षेत्रात भारत सरकार व्दारा लागु करण्यात आलेल्या श्रम संहिता संदर्भात तज्ञातर्फे कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खाण सुरक्षा निवेदक डि.एस.सालवि,खाण सुरक्षा ऊपनिदेशक एस.आर.महतो,क्षेत्रिय सुरक्षा अधिकारी डि.वेदागिरि,ऊपक्षेत्रिय प्रबंधक जुल्फिकार अंसारी, बेलोरा नायगाव खाण प्रबंधक संदीप वागले, नील जई खाण प्रबंधक प्रतापसिंह पवार, सुरक्षा अधिकारी जितेंद्र शर्मा आदि मान्यवर उपस्थीत होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्व कामगारांना शासनातर्फे लागु करण्यात आलेल्या वेतन संहिता,औद्योगिक संबंध संहिता,सामाजिक सुरक्षा संहिता तथा व्यावसायिक सुरक्षा,स्वास्थ्य तथा कार्य परिस्थिति संहिता या चार श्रम संहितांच्या संबंधात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले .या यावेळी नीलजई उपक्षेत्रीय प्रबंधक जुल्फिकार अन्सारी यांनी या चारही श्रमसंहितांविषयी मोलाचे मार्गदर्शन करून ते कामगारांसाठी कसे उपयुक्त आहे यासंबंधी विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शुभम यांनी तर उपस्थितांचे आभार बेलोरा नायगाव खान सुरक्षा अधिकारी जितेंद्र शर्मा यांनी मानले कार्यक्रमाला वेकोलि क्षेत्रातील अधिकारी, कामगार तथा ठेकेदारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!