Home चंद्रपूर NSUI विद्यार्थी कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदी राहुल वैरागडे यांची वर्णी

NSUI विद्यार्थी कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदी राहुल वैरागडे यांची वर्णी

0
88

NSUI विद्यार्थी कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदी राहुल वैरागडे यांची वर्णी

सर्व स्तरातून होतोय शुभेच्छाचा वर्षाव

 

गडचिरोली, सुखसागर झाडे

गडचिरोली जिल्ह्यातील एका अतिदुर्गम भागातून येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला NSUI (विद्यार्थी काँग्रेस) गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा चे वर्षाव होताना दिसून येत आहे. राहुल वैरागडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले आहे.
युवा संकल्प चे संस्थापक अध्यक्ष झुंजार नेतृत्ववाण शैलीचे जनक मनून सर्व परिचित, गोर गरीब दिन दुबळ्या समाजासाठी केलेली उतुंग भरारी हें त्याच्या कामाची पावती आहे. मागील अनेक वर्षापासून सामाजिक विविध उपक्रम राबवून, मूर्ती जणू लहान परंतु कीर्ती महान असे व्यक्तिमत्वचे धनी, अष्टपैलू योद्धा विविध सर्व गुण संपन्न अशी त्यांची ख्याती असून त्यांच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेत त्यांस विविध पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.

आज जी धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली ती योग्य पद्धतीने न्याय देणार यात तिळमात्र शंका नाही. हीं महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या वर सोपविल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे,काँग्रेस नेते मा. राहुल गांधी , प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गटनेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदासजी मसराम, माजी खासदार मारोतरावजी कोवासे, आमदार सुधाकर अडबले, आमदार अभिजीत वंजारी, NSUI चे राष्ट्रीय प्रभारी मा. कन्हैया कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष मा. वरुण चौधरी , महाराष्ट्र प्रभारी मा. अक्षय क्रांतिवीर,मा. कांता ग्वाला,प्रदेशाध्यक्ष मा. सागर साळुंके भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मा. विश्वजीत मारोतराव कोवासे, तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष मा. महेंद्र ब्राह्मणवाडे गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, व सर्व मान्यवर नेतेमंडळींचा मी ऋणी आहे. असं मत राहुल वैरागडे यांनी मांडले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी व संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे कार्य करण्याचा माझा संकल्प आहे. संघटनेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. अशी ग्वाही राहुल वैरागडे जिल्हाध्यक्ष, NSUI (विद्यार्थी कांग्रेस ) यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!