वाकडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन
चामोर्शी:-सुखसागर झाडे
चामोर्शी येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे विशेष शिबिर वाकडी ( जुनी) येथे उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन माननीय सरपंच मंगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय शिल्पा काशट्टीवार मॅडम यांनी भूषविले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी यांनी प्रस्ताविकेतून राष्ट्रीय सेवा योजनाची विस्तृत माहिती देत कार्यक्रमांची सुरवात केली.
यावेळी मंचावर उपस्थित सरपंच भाग्यश्री मंगर वाकडी जुनी,अंतकला प्र. मडावी उपसरपंच वाकडी जुनी, गीताताई रायसीडाम सरपंच चाकलपेठ, नामदेव पाटील किनेकार संचालक खरेदी विक्री संघ, सामाजिक कार्यकर्ते मा.मधुकर चिंतलवार, मुख्याध्यापक देवतडे सर, मा. भगवान पाटील मडावी अध्यक्ष सेवा सहकारी संस्था सोलापूर, सुरेश पाटील बारसागडे तंटामुक्ती अध्यक्ष वाकडी जुनी, मा.मधुकरराव तांदूळकर, गुणाजी सोनटक्के, आत्माराम कुंबरे, विनोद कुंबरे, अमोल मंगर गावातील प्रतिष्ठित नागरिक, वंदना काकडे, प्रतिमाताई मिसार, प्रियंका तांदूळकर, महाविद्यालयाचे प्राचार्या शिल्पा काशटीवार,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.नोमेश्वर झाडे तसेच सर्व प्राध्यापकवृंद, ग्रामस्थ तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात माननीय गावच्या प्रथम नागरिक भाग्यश्री मंगर सरपंच वाकडी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना निर्माण होते, तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते, असे प्रतिपादन केले.
या विशेष शिबिरा अंतर्गत स्वच्छता अभियान, आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर उदघाटनीय सोहळ्यात लाभलेल्या मान्यवरांनी आपले राष्ट्रीय सेवा योजना बाबत विचार मांडीत अतुलनीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितेश सावसागडे व आभार प्रदर्शन प्रा. कुणाल आंबोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे चमू तसेच प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य करण्यात आले.







