Home चंद्रपूर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो- अर्चना भोंगळे

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो- अर्चना भोंगळे

0
89

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो- अर्चना भोंगळे

गडचांदूर येथील लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये ‘पेटल फ्लॉवर’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे थाटात उद्घाटन

गडचांदूर : विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते नक्कीच आपल्या देशाचे व गावाचे नाव उज्वल करतील.शाळेचा हा उपक्रम खरोखरच अभिनंदनीय असून ‘ए सेलिब्रेशन ऑफ ग्रोथ’ ही संकल्पना मुलांच्या सर्वांगीण विकासाला पूरक असून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सौ.अर्चना देवराव भोंगळे यांनी केले.

आज गडचांदूर येथील लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये ‘पेटल फ्लॉवर’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन थाटात पार पडले.यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना सौ. अर्चना भोंगळे म्हणाल्या की, शाळेतील पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी कलेची जोड आवश्यक असते. अशा कार्यक्रमांतून मुलांमधील सर्जनशीलता आणि कल्पकता जगासमोर येते. लिटिल फ्लॉवर स्कूलने अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून मुलांच्या प्रगतीला नवी दिशा दिली आहे. कला आणि संस्कृतीची ही जोपासना भविष्यात विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवण्यास मदत करेल.असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक, सांस्कृतिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपाचे कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, सी.फ्रान्सिस, प्राचार्य मेहताब, अपर्णा उपलेंचवार यांचेसह
लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!