Home गडचिरोली श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे युवास्फूर्ती वार्षिक स्नेहसंमेलनाचे...

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे युवास्फूर्ती वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

0
109

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे युवास्फूर्ती वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

चामोर्शी:- सुखसागर झाडे

आष्टी:- श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे युवा स्फूर्ती वार्षिक स्नेहसंमेलन 2026 निमित्य सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन सोहळा पार पडला.
वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. शिक्षणासोबतच कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमधून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो. आत्मविश्वास, शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाटक पोलीस स्टेशन,आष्टी चे पोलीस निरीक्षक श्री विशाल काळे यांनी केले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेंद्र माटे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून बेबीताई बुरांडे,सरपंच, आष्टी, रेशमाताई फुलझेले, उपसरपंच, डॉ. योगेश पाटील, डॉ. रपेंद्रकुमार गौर मंचावर उपस्थित होते. सांस्कृतिक प्रमुख डॉ. मारगोनवार यांनी प्रास्ताविक मधून व्यक्तिमत्व विकासासाठी स्नेहसंमेलनाचे महत्व पटवून सांगितले आणि विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवाहन केले. आई वडील आपले गुरु असून संस्कार, प्रेम व योग्य दिशा देतात तसेच शिक्षक हे ज्ञान, शिस्त व व्यक्तिमत्त्व घडवून उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करतात असे बेबीताई बुरांडे यांनी मत व्यक्त केले. स्पर्धेच्या युगात आपल्या मध्ये असलेल्या कला गुणांचा विकास करून उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी स्नेहसंमेलन एक उत्तम व्यासपीठ आहे त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माटे सर यांनी केले.
गुरु हा ज्ञानाचा मार्गदर्शक असतो, तो केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, मूल्ये व चारित्र्य घडवतो असे प्रतिपादन डॉ. रपेंद्रकुमार गौर यांनी केले. पर्यावरणपूरक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्व, निसर्गप्रेम आणि पर्यावरण रक्षणाची सकारात्मक भूमिका विकसित होते असे मत डॉ. योगेश पाटील यांनी केले.
महाविद्यालय तर्फे स्नेहसंमेलनात रांगोळी, मेहेंदी, फ्लॉवर डेकोरेशन, डिश डेकोरेशन,फॅन्सी ड्रेस,नृत्य, गितगायन,स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन सेजल तावाडे आणि नयन सदन तर आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप कश्यप यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पी. के. सिंग, डॉ. एम. पी. सिंग, डॉ. सोनाली धवस, डॉ. दिपक नागापुरे, प्रा.महेश सिलमवार, प्रा. सुबोध साखरे, प्रा.सचिन मुरकुटे, प्रा. जया रोकडे, प्रा.कविंद्र साखरे, प्रा.राहुल आवारी, प्रा. पल्लवी शहा तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र झाडे,सविता गारगाटे, अविनाश जिवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर,उषाताई माहूरपवार, पौर्णिमा गोहणे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!