Home गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

0
102

गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

गडचिरोली:- सुखसागर झाडे

गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ बुधवार, आज दि. २१ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी, ११.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाचे नविन सांस्कृतिक सभागृह येथे पार पडला. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थानी कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. प्रशान्त बोकारे, हे प्रमुख प्राहुणे म्हणून संस्थापक, सर्च (SEARCH), चातगाव , गडचिरोली, महाराष्ट्र भूषण, पदमश्री डॉ. अभय बंग होते.
.त्यांनी दीक्षांत समारंभात मनोगत व्यक्त केले .
तसेच या समारंभात गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर डॉ. मनोज डायगव्हाणे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. श्याम खंडारे, आंतरविद्याशाखिय विद्याशाखा डॉ, प्रगती नरखेडकर, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा डॉ. जयेश चक्रवर्ती, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा डॉ.अशोक मिस्त्री, वित्त व लेखाधिकारी सि. ए. भास्कर पठारे, व्यवस्थापन परिषद सदस्य राज्यपाल नामीत प्रशांत मोहिते, स्वप्नील दोंतुलवार, विवेक गोर्लावार, डॉ. लेमराज लडके, डॉ. संजय गोरे, प्रशांत दोंतुलवार, डॉ. रंजना लाड, सहसंचालक उच्चशिक्षण नागपूर संतोष चव्हाण, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, डॉ. प्रवीण पोटदुखे, आदी उपस्थित होते .
या समारंभात विशेष गुणवत्ता प्राप्त, प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनींना सुवर्ण पदक, आचार्य पदवी व पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. संचालन सहा. प्रा. अपर्णा भाके आणि सहा. प्रा. सविता गोविंदवार तर आभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले.
सदर समारंभामध्ये, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद यांचे सन्माननिय सदस्य,दानदाते आणि विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे, मंडळाचे, समित्यांचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!