Home चंद्रपूर आमदार देवराव भोंगळेंची तत्परता : कोरपना ग्रामीण रुग्णालयाला मिळाले नवीन डॉक्टर ;...

आमदार देवराव भोंगळेंची तत्परता : कोरपना ग्रामीण रुग्णालयाला मिळाले नवीन डॉक्टर ; ओम पवारांच्या पाठपुराव्याला यश!

0
350

आमदार देवराव भोंगळेंची तत्परता : कोरपना ग्रामीण रुग्णालयाला मिळाले नवीन डॉक्टर ; ओम पवारांच्या पाठपुराव्याला यश!

कोरपना :- कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला गंभीर पेच अखेर सुटला आहे. धानोलीची उपसरपंच ओम पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत, क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार देवरावदादा भोंगळे यांनी अवघ्या एका आठवड्यात नवीन डॉक्टरांची नियुक्ती करून दिली आहे. यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड थांबली असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कोरपना ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील आरोग्याचा कणा आहे. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने रुग्णालयाची संपूर्ण धुरा केवळ एकाच डॉक्टरांच्या खांद्यावर आली होती. चोवीस तास सेवा देताना त्या एका डॉक्टरवर प्रचंड कामाचा ताण येत होता, तर दुसरीकडे उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रुग्णांना तासनतास ताटकळत राहावे लागत होते. अनेकदा गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी हलवताना मोठी अडचण निर्माण होत होती.

ही परिस्थिती लक्षात येताच ओम पवार यांनी तातडीने आमदार देवराव भोंगळे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना खासगी दवाखान्याचा खर्च परवडणारा नाही, त्यामुळे सरकारी रुग्णालयात डॉक्टर असणे अनिवार्य असल्याचे निवेदनात नमूद केले होते.

आमदारांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोग्य विभागाला निर्देश दिले आणि आठवडाभरात नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती निश्चित केली.

नव्या डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे आता रुग्णालयातील ओपीडी आणि आपत्कालीन सेवा सुरळीत होणार आहेत. आमदार देवरावदादा भोंगळे यांची कार्यतत्परता आणि ओम पवार यांचा जनहितासाठी असलेला ध्यास याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

“कोरपना ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण हा प्रामुख्याने शेतकरी आणि कष्टकरी वर्गातील असतो. केवळ एकच डॉक्टर असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नव्हते आणि डॉक्टरांवरही अन्याय होत होता. ही बाब मी आमदार देवराव भोंगळे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि आठ दिवसांत डॉक्टर उपलब्ध करून दिले. सामान्यांच्या प्रश्नावर तत्परतेने निर्णय घेणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीमुळेच आज सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे. मी या कार्याबद्दल आमदारांचे मनःपूर्वक आभार मानतो.” :- ओम पवार उपसरपंच धानोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!