देशाला प्रथम स्थानी ठेवून देशाचे यशस्वी नेत्रुत्व करणारी पिढी निर्माण करणारी शाळा म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
कु. श्वेता कोवे हिचा आदिवासी विकास मंत्री प्रा. डाॅ. अशोक ऊईके यांचे शुभहस्ते जाहिर सत्कार
गडचिरोली l सुखसागर झाडे
अखील भारतीय विद्यार्थी परिषदे चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशन गडचिरोली येथे संपन्न या अधिवेशन दरम्यान तिरंदाजी मध्ये गोल्ड मेडल मिळवुन देणा-या चामोर्शी तालुक्यातील कढोली येथील आदिवासी मुलगी कु. श्वेता कोवे हिचा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांचे हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला व पुढिल स्पर्धे करीता निधी मिळण्यासाठी मा. आयुक्त आदिवासी विकास यांना सुचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी गडचिरोली पण निधी देणार आहेत.
अध्यक्ष म्हणून ABVP राष्ट्रीय महामंत्री विरेंद्रसींह सोलंकी होते. मंचावर मा आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोविंद सारडा, डॉ. श्रीकांत पर्बत, देवशिष गोतकर, संगीत मस्के नगर मंत्री उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार डॉ. अशोक नेते, राष्ट्रीय महामंत्री भाजपा एसटि मोर्चा, भाजपा जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, नगराध्यक्ष सौ. प्रणीती निंबोरकर, बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. देवराव जी होळी, जिल्हा महामंत्री श्री प्रकाश गेडाम, माजी आमदार डॉ नामदेव जी उसेंडी, डॉ. चंदाताई कोडवते, भाजपा शहर अध्यक्ष अणील कुणघाडकर, तालुका अध्यक्ष दत्तु सुत्रपवार, माजी नगराध्यक्ष सौ. योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, उपस्थित होते.









