अखेर ग्रामपंचायत दोटकुली येथील आमरण उपोषणकर्त्यांना आले यश
सहाय्यक गट विकास अधीकारी माधुरी येरमे यांनी निंबूपाणी देत उपोषणाची केली सांगता
चामोर्शी, सुखसागर झाडे : ग्रामपंचायत दोटकुली येथील ग्रामस्थांनी रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते. प्रशासनानी कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आपली रास्त मागणी संदर्भात न्याय मिळवून घेण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसले.
श्री. हनाजी कैकाडू शेंन्डे व इतर ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार, दोटकुली येथील श्री. शिवराम नानाजी ढोबे हे संबंधित मार्गावरून जाण्या-येण्यास अडथळे निर्माण करत असून, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित विषयाला अनुसरून रागाच्या भरात अनुचित प्रकार अथवा कोणत्याही प्रकारे जीवितहानी होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
या समस्येबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती चामोर्शी, तहसीलदार कार्यालय चामोर्शी, उपविभागीय अधिकारी (एसडीओ) चामोर्शी तसेच जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असा दावा आंदोलक ग्रामस्थांनी केला . “दहा दिवसांची मुदत देऊनही रस्ता मोकळा करून देण्यात आला नाही.
त्या अनुषंगाने आता न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नव्हता,” असे आंदोलकांचे म्हणणे होते.
उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला असता, प्रशासनाने ताबडतोब दखल घेत, व उपोषणकर्त्यांच्या रास्त मागणीचा कायदेशीर अभ्यास करून योग्य सल्लामसोरा व चर्चा करून सत्याचा विजय घोषित करण्यात आला.
अखेर प्रशासनाने दखल घेत उपोषण कर्त्यास पाठिंबा देत लेखी पत्र देऊन येत्या 15 दिवसामंध्ये मागणी नुसार वहिवाटी करिता मार्ग मोकळा करून देऊ असे लेखी आश्वासन देत उपोषणास पूर्ण विराम देण्यात आला.
यावेळी उपोषणस्थळी सहा. गटविकास अधिकारी माधुरी येरमे, ग्रामपंचायत सरपंच जया सातपुते,विस्तार अधिकारी पं. चलाख, निकुरे भूमिअभिलेख,मंडळ अधिकारी सचिन सोमणकर,महसूल अधिकारी ठाकरे,ग्रामपंचायत अधिकारी शेंडे,सर्व उपोषणकर्ते तसेच ग्रामपंचायत सदस्य गण, व गावाकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









